टि.जे.च्या नावाने चांगभलं...

पुणे दिनांक 26 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उत्साह,जल्लोषाने झाले.प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात सोमवार,दि.२७ जानेवारी ते रविवार, ०१ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ.सतीश देसाईंनी यांच्या हस्ते "टि,जे.च्या नावाने चांगभलं"या संमेलन प्रतीकाच्या अनावरणाने झाले. याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे आनंद छाजेड, सुरजभान अग्रवाल, प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपस्थित होते. 


  विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या "टि.जे. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वतःहून विविध कला, संस्कृती, परंपरा, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कलागुण कौशल्याधिष्ठित कार्यक्रमाचे स्वतः आयोजन, संयोजन आणि नियोजन केलेले आहे. अशी माहिती  प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी यावेळी दिली. महाविद्यालयात पहिल्यांदाच असे  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:२०२० अवलक्षुण होणाऱ्या अनोख्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे डॉ.सतीश देसाई यांनी कौतुक करताना  खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे  सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे ते कणा आहेत असा गौरवाने उल्लेख केला.प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या स्नेहसंमेलन विषयीच्या अनोख्या कल्पनेचे शिक्षण क्षेत्रात नक्कीच स्वागत होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली.

  वार्षिक स्नेहसंमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे सुंदर असे फलक विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून महाविद्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाच्या रूपरेषेसह लावले आहेत. अशी माहिती सांस्कृतिक विभागप्रमुख, उपप्राचार्या डॉ. सुचेता दळवी यांनी दिली. यावेळी प्रा. जुगल नाईक, डॉ. स्वाती राजन, प्रा. गौरी माटेकर,प्रा. बाळासाहेब कांबळे, डॉ. डी.एम. मुपडे,डॉ. निलेश काळे, डॉ. अविनाश कोल्हे, डॉ. शैलेंद्र काळे, डॉ. पद्माकर घेले, प्रा. शुभम पटारे, डॉ.शितल रणधीर, प्रा. आरती चोळेकर, प्रा. शुबांगी पाटील, प्रा. अर्चना तारू, प्रा. योगिता झोपे, प्रा.पियु निरभवणे, प्रा. मारिया घडीयाली, प्रियंका बनकर, डॉ. ज्योती वाघमारे, प्रा. मेहनाज कौसर, प्रा. प्रिय शिर्के,प्रा. नमिता कुलकर्णी, प्रा.अमृता खेदांड, प्रा.अर्चना तारू, ग्रंथपाल, प्रा.आनंद नाईक, अधीक्षक लक्ष्मण डामसे, डॉ. तेजस्विनी शेंडे, प्रा. भागवत शिंदे प्रा.कविता चव्हाण, डॉ. सुजाता भालेराव, डॉ. कांचन गेंडाम, डॉ.भाग्यश्री माताडे, डॉ. दिपाली अवसरमल उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंवादन उपप्राचार्य, प्रा. राजेंद्र लेले यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. महादेव रोकडे यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश