दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन

  

तळेगाव दाभाडे दि.१२ (प्रतिनिधी) : समाज हिताकरिता उदार अंतकरणाने सदैव भरभरून मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व सनदी लेखापाल (सीए) ला. चंद्रकांत माणिकलाल शहा अर्थात सी. एम. शहा (वय.९३) यांचे शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या तळमळीने नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कै. ला. सी. एम. शहा यांच्या योगदानातून ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने पवनानगर येथे ला. शांता माणेक पवना ज्यूनिअर कॉलेजची उभारणी झाली. त्यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य म्हणून तसेच ला. शांता माणेक पवना ज्युनिअर कॉलेजच्या ज्येष्ठ सदस्य पदाची धुरा सांभाळली. लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या नेत्ररोग शिबिरांचा भरीव वाटा उचलीत त्यांनी मुंबई येथील लायन्स क्लब ऑफ कलिना आणि जुहूच्या माध्यमातून आजवरचे सर्व नेत्र शिबिरे यशस्वीरित्या पार पाडली. मावळ परिसरातील नेत्र रुग्णांकरिता नेत्र शिबिरांचे जनक आणि दृष्टीकिरण ते ठरले.

रोटेरियन तथा उद्योजक दीपकभाई शहा, शैलेशभाई शहा आणि नूमविप्र मंडळाचे ज्येष्ठ संचालक महेशभाई शहा यांचे ते ज्येष्ठ चुलत बंधू होत. सी. एम. शहा हे व्यवसायाने सीए होते. सांताक्रुज येथील सी. माणिकलाल अँड कंपनी या सुप्रसिद्ध सीए फर्मचे ते मुख्य संचालक होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा