किरण शितोळे यांनी सीए परीक्षेत मिळवले घवघवीत यश

 

पुणे दि. ६ (प्रतिनिधी ) दौंड तालुक्यातील रोटी हे मूळ गाव असलेल्या व सध्या हडपसर मध्ये वास्तव्यास असलेल्या किरण शितोळे यांनी  नुकत्याच Institute of Chartered Account यांनी घेतलेल्या सीए परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून CA (सनदी लेखापाल) होण्याचा बहुमान मिळवला आहे.

 किरण शितोळे हे साधना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य विजयराव शितोळे तसेच जिजामाता सहकारी बँकेच्या संचालिका शितोळे मॅडम यांचा चिरंजीव असून लहानपणापासूनच घरामध्ये शैक्षणिक वातावरण होते. 




इयत्ता बारावीला सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील साधना जुनिअर कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भविष्यामध्ये सीए होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.

आई-वडिलांचे पाठबळ, त्याचप्रमाणे शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन करता आले असे किरण शितोळे यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले. या यशाबद्दल किरण शितोळे यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.किरण शितोळे सनदी लेखापाल  झाल्याबद्दल दौंड तालुका,हडपसर मित्र परिवार तसेच राज्य टीडीएफ च्या वतीने कु. किरण शितोळे यांचा राज्य टीडीएफचे अध्यक्ष माननीय जी.के. थोरात सर मा. प्राचार्य  संजीव  यादव सर, मा. प्राचार्य शिवाजीराव कामथे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  प्रा. सुनील राजे निंबाळकर सर, प्रा. शशिकांत शिंदे सर आपल्या मनोगतून शुभेच्छा दिल्या.

 यावेळी मा. मुख्याध्यापक बी.टी. थोरात सर, उपप्राचार्य बाळासाहेब खाडे सर, विलास जगताप सर, पुणे शहराध्यक्ष संतोष थोरात सर, पाटील सर  उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा