एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॅालेजने रचला जागतिक विक्रम

 

आळंदी दि. 7 (प्रतिनिधी) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 750 व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव  व आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या 745 व्या जन्मोत्सवानिमित्त, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन,  मुक्ताईनगर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था,  आणि एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॅालेज, आळंदी यांच्या सहकार्याने एक दिवसीय तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन, आळंदी, पुणे येथील मोरया मंगल कार्यालय, आळंदी, या ठिकाणी आयोजित  करण्यात आले होते. सदर संमेलनाचे उद्घाटक हे मा. श्री. सुधीर जी गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक) यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी मा.प्रा. सुमतीताई पवार,  (ज्येष्ठ कवयित्री)  या होत्या.सदर संमेलनाच्या कार्यकारणीमध्ये प्रमुखपदी  मा. डॉ. शिवचरण उज्जैनकर, संयोजकपदी श्री. प्रकाश देवराम काळे, सहसंयोजकपदी श्री. अजित वडगावकर, कार्याध्यक्षपदी मा. श्री.सुरेश काका वडगावकर, सहकार्याध्यक्षपदी मा. श्री रामचंद्र कुऱ्हाडे पाटील, निमंत्रक पदी  सौ.रूपालीताई चिंचोलीकर,  सहनिमंत्रकपदी  डॉ. ज्ञानेश्वर पाटील तसेच स्वागताध्यक्षपदी मा. प्रा. डॉ. सुरेंद्र हेरकळ,  प्राचार्य, एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज,  आळंदी हे सर्व पदाधिकारी होते.



सदर संमेलनामध्ये आदिशक्ती संत मुक्ताई कडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांना 750 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त 750 फूट लांब व 75 किलो वजनाची ( जगातील सर्वात वजनदार ) राखी बांधून या संमेलनाचे उद्घाटन ज्ञानेश्वर मंदिर परिसरामध्ये सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. जगातील सर्वात वजनदार राखीची निर्मिती ही माईर्स, एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज, आळंदी व एकमुखी दत्तमंदिर भजनी मंडळ, ढमाळवाडी यांच्याकडून करण्यात आलेले होती. ही राखी एमआयटी संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या शुभहस्ते माउलीना अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आदिशक्ती मुक्ताई आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या बंधू प्रेमाची भावना व्यक्त करताना म्हटले.. आदिशक्ती मुक्ताई यांचे ताटीचे अभंग आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ जीवनाला आकार देणारे असून वैश्विक शांतीसाठी पूरक ठरणारे आहेत. राखीची संकल्पना आणि निर्मिती करणारे प्राचार्य डॅा. सुरेंद्र हेरकळ यांनी ही राखी जगातील सर्वात मोठी व वजनदार असल्याचा दावा केला आणि ही राखी आदिशक्ती मुक्ताई व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावाने हा विश्वविक्रम होत असल्याने आनंद व्यक्त केला. या राखीमध्ये 21 किलो टाळ, 21 किलो रुद्राक्ष, 11 किलो चिपळ्या, 5 किलो तुलसीमाळ, 11 किलो कापड रेशीमदोरा, माउलीचे नाणे, 6 किलो प्रतीकचिन्ह  याचा उपयोग करण्यात आला असल्याचे सांगितले. या रक्षाबंधन सोहळ्यासाठी संत निवृत्तीनाथ देवस्थान, संत सोपानकाका देवस्थान, संत तुकाराम देवस्थान यांना आमंत्रण दिलेले होते. 

सदर अध्यात्मिक साहित्य संमेलनाचे असे एैतिहास व आगळे - वेगळे उद्घाटन केल्याबद्दल आळंदी आणि परिसरातील नागरिकांनी राखीचे पाहण्यासाठी गर्दी करून कौतुक केले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा