सशक्त समाज हेच प्रगतीचे लक्षण - कौस्तुभ कुलकर्णी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे



तळेगाव दाभाडे दि. 26 (प्रतिनिधी) सशक्त समाज हेच प्रगतीचे लक्षण आहे. नवीन उद्योग, आरोग्य, शिक्षण यात अमुलाग्र बदल होत आहे. कुशल मनुष्यबळ हे आजच्या काळाची गरज आहे. मेडिकल, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत. त्यासाठी चांगले शिक्षण गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. नवीन उद्योगांकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे असे मत कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते आज इंद्रायणी महाविद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर कॉन्टिनेन्टल इंटरनॅशनल ग्रुप चे मान्यवर तसेच मिस्टर दुवा किंग उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते. याप्रसंगी खजिनदार शैलेश शहा, संजय साने, निरुपाताई कानिटकर, युवराज काकडे , विलास काळोखे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. संजय आरोटे, आदी मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी होंडाई या कंपनीचे कोरियन अधिकारी आहे मिस्टर किम उपस्थित होते. त्यांनी ह्युंदाई कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेत काहीतरी मिळवायचे असेल तर वेळे सत्कारणी लावा असे विचार मांडले. ध्येय उच्च असेल तर यशस्वी होता येते .हा संदेश देत हरियाणा आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रातील हुंदाई च्या यशस्वीतेचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे रणजीत काकडे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग उभे राहिले पाहिजे देश आणि केवळ देशच यासाठी दक्षिण कोरियाची लोक काम करत आहेत आपण सर्व विद्यार्थ्यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.

 त्याचबरोबर संधीची समानता हे उद्देश पत्रिकेतील शब्दांकडे लक्षवेधीत संधीची वेळ ओळखता आली पाहिजे. ज्ञान हेच तुम्हाला हक्क मिळवून देणारे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी ज्ञानाची ताकद पनाला लावा लावा असे मत बोरा यांनी व्यक्त केले.

 आपल्या प्रास्तविकात इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी प्रियंका इंगळे हिने नुकत्याच पार पडलेल्या खो-खो वर्ल्ड कपचे नेतृत्व करत भारताला खो-खोमध्ये वर्ल्डकप मिळून दिल्याची आनंददायी भावना व्यक्त केली. यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. डॉ. संभाजी मलघे यांनी 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्याचा आढावा घेत संस्थेच्या कार्याची घोडदौड अधोरेखित केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी संस्थेतील विकासाच्या प्रगतीचा आढावा घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा समारंभ यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. आर. डोके यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा