पुणे जिल्हा माध्यमिक महिला शिक्षिका संघाच्या अध्यक्षपदी स्नेहल बाळसराफ यांची बिनविरोध निवड


तळेगांव दाभाडे दि. ६ (प्रतिनिधी) पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टीडीएफ ची वार्षिक सर्वसाधारण सभा भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र राज्य टीडीएफ चे कार्यवाह मा. के. एस. ढोमसे सर यांच्या अध्यक्षतेखालीनुकतीच संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्रैवार्षिक निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये पुणे जिल्हा महिला माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व  निरिक्षक मा. जी.के. थोरात सर, पुणे विभाग टीडीएफ चे अध्यक्ष व निरिक्षक मा.शिवाजीराव कामथे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.वसंतराव ताकवले, पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष संतोष थोरात यांच्याकडून करण्यात आले. 

स्नेहल बाळसराफ  या मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या गेली अनेक वर्षे जिल्यात एकमेव महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्याच्या कारकिर्दी मध्ये गुणवत्ता शिक्षण शिक्षक प्रशिक्षण , विज्ञान प्रदर्शने व अनेक कार्यशाळा आयोजित करून मावळ तालुक्याची आगळी वेगळी प्रतिमा निर्माण केली त्यांचा निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मावळ तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बालम शेख, मावळ तालुका टीडीएफचे अध्यक्ष राधाकृष्ण येणारे, मावळ तालुका महिला टीडीएफ अध्यक्षा वर्षा बारबोले उपस्थित होते. या निवडीबद्दल मावळ तालुक्यातून स्नेहल बाळसराफ यांच्यावर कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा