इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संदिप भोसले यांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार



तळेगाव दाभाडे दि 7 (प्रतिनिधी) आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र यांच्या वतीने इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक संदीप प्रल्हाद भोसले यांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार  रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी शिरवळ सातारा या ठिकाणी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


प्रा.संदिप भोसले इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत गेल्या 25 वर्षापासून ज्ञानदानाचे अविरतपणे करत असलेल्या कार्याची तसेच समाजाप्रती असलेले निष्ठा प्रेम शैक्षणिक क्षेत्रातील अनन्यसाधारण काम अनेक गरजूंना दिलासा व आत्मविश्वास देऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य असलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी केनिथ कीर्तीजी आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते धावपटू तसेच आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, विवेक गुरव, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनकुमार भरगुडे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा.संदिप भोसले यांना मानपत्र व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यावाह चंद्रकांत शेटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे संस्था पदाधिकारी सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी देहू नगरीचे नगरसेवक योगेश काळोखे व मित्रपरिवार तसेच सातारा जिल्ह्यातील आदर्श शिक्षक अरूण भोसले खातगुण येथील मित्र परिवार आदि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तसेच याप्रसंगी प्रा.एन.टी. भोसले,प्रा.के.डी.जाधव,प्रा.विजय खेडकर उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा