तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनतर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सन्मान व मार्गदर्शनाने रंगला कार्यक्रम
तळेगाव दाभाडे: दि. 6 (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उद्योजक संग्राम जगताप यांच्या हॉटेल ड्रीम लंच येथे आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सन्मान व विचारमंथन झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक , ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी प्रेस फाउंडेशनचे संस्थापक विलास भेगडे, संस्थापक अध्यक्ष अमीन खान, प्रेस फाउंडेशनचे सल्लागार योगेश्वर माडगूळकर, रमेश जाधव गुरुजी, अध्यक्ष महेश भागीवंत, सचिव केदार शिरसट, पत्रकार परिषद प्रमुख रेश्मा फडतरे ,प्रकल्प प्रमुख रेखा भेगडे, राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, डॉ . संदीप गाडेकर, मयूर सातपुते,उद्योजक संग्राम जगताप, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बबनराव भेगडे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारितेतील स्वातंत्र्य, सत्यतेचे महत्त्व व पत्रकारांची समाजातील जागल्याची भूमिका अधोरेखित केली.पत्रकारिता ही भयापासून, मर्जीपासून आणि सत्याशिवाय अन्य कोणत्याही बाबीपासून मुक्त असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बबनराव भेगडे म्हणाले, मी ही जर्नालिझम केले आहे.
त्यामुळे मला पत्रकारांविषयी आदर आहे. पत्रकारांच्या सर्व अडचणी मी जाणतो, असे सांगून पत्रकारांचे कौतुक केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. पत्रकारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
__
Comments
Post a Comment