ॲड्.पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा



तळेगाव स्टेशन दि. 27 (प्रतिनिधी) ॲड्.पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये दिनांक 14 जानेवारी 2025 ते 28 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. शासन परिपत्रकाप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे व पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

दिनांक 18 जानेवारी रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत मराठी भाषा ग्रंथदिंडी, प्रभात फेरी, घोषवाक्य लेखनस्पर्धा ,चारोळी लेखन स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन विद्यालयातील शिक्षिका अनिता नागपुरे, सुवर्णा काळडोके, प्रभा काळे यांनी केले. दिनांक 20 जानेवारी रोजी विद्यालयामध्ये निबंध लेखन, हस्ताक्षर, शुद्धलेखन, कविता लेखन, कथालेखन इत्यादी स्पर्धा यांचे आयोजन गायत्री जगताप, रुपाली सरोदे यांनी केले. 21 जानेवारी रोजी प्रश्नमंजुषा, शब्दकोडी, काव्यवाचन या स्पर्धेचे आयोजन विद्यालयातील शिक्षिका सुजाता कातोरे व स्वाती तांबिरे यांनी केले. दि. 22 जानेवारी रोजी वादविवाद स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा ,परिच्छेद अनुवाद स्पर्धा यांचे आयोजन आशा आवटे व सुषमा दाते व कविता पाखरे यांनी केले. 



दि. 23 जानेवारी रोजी मराठी वाचन संस्कृती वाढावी यासाठी तज्ञ व्यक्ती अरुंधती देशपांडे (राष्ट्रसेवा समितीच्या कार्यकर्त्या) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ग्रंथप्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन नाजुका सोनकांबळे प्रिया कांबळे यांनी केले. 24 जानेवारी रोजी मराठी भाषिक व्यक्ती विद्यालयातील पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांचा सत्कार व मुलाखत विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला. याद्वारे विद्यार्थ्यांना मराठी भाषेची थोरवी व महत्त्व सांगण्यात आले. 25 जानेवारी रोजी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची प्रसिद्धी करण्यात आली.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश