स्नेहवर्धन पुणे जिल्हा अंतर अद्यापक विद्यालयीन कला क्रीडा स्पर्धेत बाफना डी एड कॉलेज चे नेत्रदीपक यश



तळेगाव दाभाडे दि.30 (प्रतिनिधी)  इंद्रायणी महाविद्यालयाच्या क्रीडागणात जिल्हा क्रीडा स्पर्धा नुकत्याच  घेण्यात आल्या. यावेळी उदघाटनपर कार्यक्रमात जिल्हा सचिव प्राचार्या  उज्ज्वला सावंत व उपसचिव प्राचार्य हिरामण लंघे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्यातील 15 डी .एड कॉलेज ने सहभाग नोंदवला. 


या क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक बाबीमध्ये हरकचंद रायचंद बाफना डी. एड. च्या आरती पवार - राऊत हिने थाळी फेक मध्ये द्वितीय, मेघराज दिनेश राऊत या विद्यार्थ्याने गोळा फेक मध्ये द्वितीय तर 4×100 रिले स्पर्धेत अनुक्रमे साक्षी नलावडे, मोनिका कुंभार, स्वेता लोखंडे आणि आरती कारके, सपना चव्हाण व अंकिता कोकणे यांनी तृतीय क्रमांक पटकवला. 

यावेळी प्रा. राजेंद्र डोके, डॉ. मनोज गायकवाड, प्रा. शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई आणि प्रा. योगेश जाधव यांनी त्यांना मार्गदर्शन केले. नंदकिशोर मुगेरा आणि सोमनाथ धोंगडे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले आणि सचिव अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश