कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम ध्येय ठरवा.. मग तुम्ही 'राजा' व्हाल ! - कृष्णकुमार गोयल


"कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम, अत्युच्च ध्येय आणि प्रखर महत्त्वाकांक्षा यांची आवश्यकता आहे म्हणून सर्वोत्तम ध्येय उराशी बाळगून यशस्वी व्हा ! 'असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे'अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांनी केले.

खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या टी.जे.चं. चांगभलं! या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी श्री. विजय भंडारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले. संस्थेच्या प्रगतीचाही गौरवपूर्ण उल्लेख केला गेला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वात्रटिकाकार श्री. रामदास फुटाणे तसेच खडकी शिक्षण संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते.. याप्रसंगी श्री. भंडारी आणि फुटाणे यांचे शुभहस्ते विशेष उल्लेखनीय कार्य केलेला प्राधापकांचा तसेच शैक्षणिक,सांस्कृतिक,इत्यादी क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून गुण गौरव करण्यात आला . 

   वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी  आगामी काळात सर्वांनाच नोकऱ्या उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तुमच्या मध्ये जी कौशल्य आहेत, त्यांचा विकास करुन व्यवसाय निर्माण करा.. आधी स्वतःचे करीअर करा, इतरामागे धावू नका' असे सांगून कंटपीस, करोना आदी कविता सादर करून त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.

श्री. कृष्णकुमार गोयल यांनी टी. जे. चं. चांगभलं या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीला व्यवसायात रुपांतरीत करा. 

यावर्षी प्रथमच सर्व कार्यक्रमांचे आयोजन नियोजन सूत्रसंचालन सर्वकाही विद्यार्थ्यांनी केले. 
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविकरूपाने महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. महादेव रोकडे आणि प्रा. गौरी माटेकर यांनी केला. स्नेहसंमेलन प्रमुख म्हणून डॉ. सुचेता दळवी यांनी कामकाज पाहिले, समन्वय समितीतील डॉ. अविनाश कोल्हे, प्रा.जुगल नाईक, प्रा.राजेंद्र लेले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
उपप्राचार्य डॉ. सुचेता दळवी यांनी आभार प्रदर्शन केले.तर कु. ज्योत्स्ना ठाकुर, रितेश वाघमारे, राकेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा