ज्येष्ठांनी अनुभवाची परिपक्वता समाजापर्यंत पोहोचवावी - कृष्णकुमार गोयल up

 

 पुणे दि. 11 (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक कक्ष तसेच खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालय आणि ज्येष्ठ नागरिक संघ बोपोडी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिर पार पडले.



  शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कृष्णकुमार गोयल आपल्या मनोगतात ज्येष्ठांच्या अनुभवातील परिपक्वते विषयी बोलताना ज्येष्ठांनी आपला अनुभव समाजापर्यंत पोहोचवावा, आयुष्यात जे जे राहिले आहे ते सर्व पूर्ण करावे. सुखदुःखासह स्वप्न पूर्ण करण्याचा काळ म्हणजेच वृद्धत्वाचा काळ. काळासोबत स्वतःला बदला.समाजासोबत आनंदाने जगा असे प्रतिपादन केले 

   शिबिरार्थी मार्गदर्शक डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी'ज्येष्ठांचे आरोग्य' याविषयी विचार मांडताना ज्येष्ठांनी नियमित व्यायाम, वाचन,वस्त्र याची काळजी घेताना व्यसन टाळावे. हा आरोग्यदायी संदेश दिला. 


 दुसरे मार्गदर्शक गझलकार डॉ. विजय काकडे यांनी आपल्या 'गझल गप्पा आणि गाणी'या विषयातून ज्येष्ठांचे मनोरंजन केले अनेक अर्थाच्या विविध गझल त्यांनी सादर केल्या.'केव्हा कोण जाणे, कष्टात जन्म गेला या गझलांनी उत्स्फूर्त दाद मिळविली. ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हास्यविनोदकार मकरंद टिल्लू त्यांनी हास्याचे एकपात्री प्रयोग सादर करून ज्येष्ठांचे मंने जिंकले. सहभोजनाच्या आस्वादनंतर ज्येष्ठांनी लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.बाळकृष्ण लळीत यांचे 'महाराष्ट्रातील लोककला'या विषयावर व्याख्यान झाले. जगलेल्या जिवंत संस्कृती लोकपरंपरेचा् वारसा ज्येष्ठांसमोर त्यांनी उभा केला.

   शिबिराचे प्रास्ताविक टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संजय चाकणे यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय हिंदी विभागप्रमुख डॉ. अविनाश कोल्हे यांनी करून दिला. शिबिराचे संयोजन बहि:शाल समन्वयक प्रा.ज्योती वाघमारे, यांनी केले. यावेळी डॉ. दिपाली औसरमल, प्रा.महादेव रोकडे, प्रा.भागवत शिंदे उपस्थित होते.शिबिराचे सूत्रसंवादन रितेश वाघमारे आणि राकेश परदेशी या विद्यार्थ्यांनी केले . शिबिरात उपस्थित सर्वांचे आभार ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा