टी.जे. महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे विद्यार्थी विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेत सहभागी

 

पुणे दि. 17 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी पुणे येथील भूगोल विभागाचे दोन विद्यार्थी एक दिवशीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा,  अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर या ठिकाणी  सर्वेक्षणातील बदलते तंत्रज्ञान -भूमापन ते ड्रोन या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. 



सदर विद्यार्थ्यांनी भूमापन पद्धती यांचा या कार्यशाळेत अभ्यास केला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध तज्ञ मार्गदर्शक यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे,  भूगोल विभाग प्रमुख डॉ. निलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते.



 सदर कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात मार्गदर्शक प्राचार्य डॉ. चाकणे सर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी भूगोल विभाग प्रमुख डॉ. निलेश काळे, भूगोल विभागाचे प्रा. शुभम पटारे, डॉ. दिपाली औसरमल, प्रा. कांचन पाटील उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश