महिला पत्रकारांसाठी प्रेरणादायी क्षण तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी रेश्मा फडतरे

 


 नूतन अध्यक्ष रेश्मा फडतरे यांचा सत्कार करताना प्रेस फौंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य

तळेगाव दाभाडे दि.16 (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे प्रेस फौंडेशनच्या अध्यक्षपदी रेश्मा फडतरे यांची तर उपाध्यक्षपदी रमेश जाधव गुरुजी यांची बिनविरोध निवड झाली. सचिवपदी केदार शिरसट, कार्याध्यक्षपदी जगन्नाथ काळे, खजिनदारपदी अंकुश दाभाडे यांची फेरनिवड  करण्यात आली. रेखा भेगडे यांची पत्रकार परिषद प्रमुख म्हणून निवड झाली.


रविवार (दि. १६) ज्येष्ठ  पत्रकार विवेक इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. पिठासन अधिकारी म्हणून मंगेश फल्ले यांनी काम पाहिले. त्यानंतर नूतन कार्यकारिणीची  बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.  यावेळी संस्थापक विलास भेगडे, संस्थापक अध्यक्ष अमीन खान, मावळते अध्यक्ष महेश भागीवंत, पदाधिकारी व सदस्य  उपस्थित होते.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रेश्मा फडतरे यांनी आपल्या मनोगतच सांगितले की पत्रकारितेत महिलांची योगदान वाढवण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील ही जबाबदारी स्वीकारताना संघटनेच्या सर्व सदस्यांचे सहकार्य मला महत्त्वाचे वाटते.



नूतन कार्यकारिणी याप्रमाणे:-
अध्यक्ष : रेश्मा फडतरे (महाराष्ट्र लाईव्ह 1)
कार्याध्यक्ष : जगन्नाथ काळे (पुढारी)
उपाध्यक्ष : रमेश जाधव गुरुजी (सकाळ)
सचिव : केदार शिरसट (पुण्यनगरी)
खजिनदार : अंकुश दाभाडे (प्रेस फोटोग्राफर)
प्रकल्प प्रमुख : अमीन खान (पुढारी)
पत्रकार परिषद प्रमुख : रेखा भेगडे (सतर्क महाराष्ट्र)
सल्लागार: विवेक इनामदार (बातमी तुमची आमची मावळ ऑनलाईन), योगेश्वर माडगूळकर (लोकमत), विलास भेगडे (लोकमत), सचिन शिंदे (महाराष्ट्र लाईव्ह 1), मंगेश फल्ले (दिव्य मराठी), सागर शिंदे (पुढारी न्यूज), अनिल भांगरे (महाराष्ट्र क्रांती), नितीन फाकटकर (रोखठोक मावळ)
कार्यकारिणी सदस्य: महेश भागीवंत,राधाकृष्ण येणारे,संदीप भेगडे, रमेश फरताडे, संतोष थिटे, ज्ञानेश्वर टकले,  डॉ.संदीप गाडेकर, सुरेश शिंदे,  अमित भागीवंत, चित्रसेन जाधव, बद्रीनारायण घुगे, कैलास भेगडे, अभिषेक बोडके, विकास वाजे, बद्रीनारायण पाटील, मयूर सातपुते, ऋषिकेश लोंढे.
महेश भागीवंत यांनी प्रास्ताविक केले. विवेक इनामदार , आमिन खान, मंगेश फल्ले यांनी मार्गदर्शन केले. विलास भेगडे यांनी आभार मानले.



डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा