इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 


लोणावळा दि. 20 (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी ढोल-ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली.



            या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ.हरीश हरसूरकर,प्रो.सोनी राघो,प्रो.सायली धारणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.रोहित जगताप तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन वातावरण शिवमय केले.



या सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने केले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश