पुणे दि.07 (प्रतिनिधी) खुटबाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोष परशुराम थोरात व पत्नी सोनाली थोरात या शिक्षक दांपत्याला आजीवन शिक्षणाचा लळा लागलेला आहे. यामध्ये संतोष थोरात यांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यापासून आजतागायत शाळेचा दाखला काढलेला नाही व वयाच्या 45 व्या वर्षातही त्यांचे शिक्षण अविरतपणे सुरू आहे. आज पर्यंत त्यांनी शिक्षणातील एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 13 पदव्या संपादित केलेल्या आहेत. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी. चे संशोधन करीत आहेत. नुकतेच त्यांनी जर्मन भाषेच्या चार लेवल पूर्ण केलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी मराठी, हिंदी,इंग्रजी, इतिहास व लोक प्रशासन या पाच विषयात एम.ए. केलेले असून, एम एड एम. फील, शाळा व्यवस्थापन पदविका, मास मीडिया कम्युनिकेशन अँड जर्नालिझम पदविका, डिप्लोमा इन योगा यांसारख्या पदव्या ही अतिउच्च श्रेणीत मिळवलेल्या आहेत.

सध्या संतोष थोरात हे आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर या शाळेमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यूट्यूब चैनल निर्मितीच्या माध्यमातून जर्मन भाषा शिकून व्हिडिओ निर्मिती करून जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांना त्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच अनेक शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती केलेली आहे.
इंग्रजी व्याकरणाची त्यांची तीन पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली असून राज्य व राष्ट्रीय स्तरावर दोन शोधनिबंधही त्यांनी प्रकाशित केलेले आहेत.
पती संतोष थोरात यांच्या शिक्षणाच्या आवडीने प्रभावित होऊन त्यांच्या पत्नी सोनाली याही त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण घेत आहेत. त्यांनीही शिक्षणशास्त्र व राज्यशास्त्र या दोन विषयांमध्ये एम. ए. केलेले आसून सध्या त्याही राज्यशास्त्र या विषयात पी.एचडी करीत आहेत. सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळमाळा, तालुका हवेली, केंद्र कुंजीरवाडी या केंद्रामध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल दोन्ही उभयतांना अनेक सामाजिक, शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
संतोष थोरात यांचा जन्म 1980 मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला आई-वडील निरक्षर असल्याने त्यांनी क्षणाचा निर्णय घेतला. 2005 मध्ये शिक्षकी पैशाच्या नोकरीला सुरुवात केल्यानंतर डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या विषयी माहिती त्यांच्या वाचनात आली. त्यांच्या अनेक पदव्या पाहून त्यांचे शिक्षण पाहून ते प्रभावित झाले व त्यांनी सुद्धा अशा पदव्या मिळवण्याचे ठरवले.
या सर्व प्रवासामध्ये कुटुंब तसेच मित्र परिवाराचे सहकार्य व मोलाचे साथ मिळाली यांच्या सहकार्याने हे शक्य झाले नसते असे त्यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले. भविष्यामध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा असून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये व्याख्याता बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.
नुकतीच सकाळ वृत्तपत्र समूहाने शैक्षणिक आलेखावर प्रकाशित केली होती याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment