शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, येथे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन



पुणे दि. 17 (प्रतिनिधी) शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, येथे दिनांक-17 -20 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. गीता शिंदे, क्रीडा समन्वयक प्राप्ती देवकाते, डॉ. वैभव जाधव, डॉ. गायत्री चौकडे आणि विभागातील सर्व प्राध्यापक तसेच बीएससी बीएड आणि एम. ए.एज्युकेशन या वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 तीन दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये, विविध खेळांचे सामने पार पाडणार आहेत, यात सहभागी झालेल्या छात्र अध्यापकांना भविष्यात क्रीडा स्पर्धेचे नियोजन कसे करावे आणि खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना कसे पटवून द्यावे यासाठी प्रत्यक्षपणे मैदानावर अनुभव देण्याचे आयोजन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनाप्रसंगी नॉर्वे या देशातून आलेले प्राध्यापक अस्मंट आमास, प्राध्यापक कार्ल क्रिस्टीन व त्यांचे विद्यार्थी  यांनीही उस्फूर्तपणे भारतीय खेळाबद्दल माहिती जाणून घेतली.

विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य शिंदे आणि विद्यार्थी क्रीडा समिती यांच्या वतीने पुढील दोन दिवसात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा