शिवाजी मराठा सोसायटीचें अध्यापक महाविद्यालय, अरणेश्वर पुणे यांच्या वतीने तळजाई टेकडी प्लास्टिक मुक्त समाजसेवा शिबिर संपन्न


पुणे  दि. १८ (प्रतिनिधी) – शिवाजी मराठा सोसायटीच्या अध्यापक महाविद्यालय, अरणेश्वर पुणे 09 यांच्या वतीने पुणे शहरातील ऐतिहासिक तळजाई टेकडी परिसरात प्लास्टिक मुक्त तळजाई अभियान राबविण्यात आले. या समाजसेवा शिबिरात शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत 155 किलो प्लास्टिक कचरा गोळा करून पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे सुपूर्द केला.  


या अभियानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. चौगुले यांनी मार्गदर्शन केले, तसेच प्राध्यापक वाय. के. पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन पाहिले. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी शिक्षकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.  



या उपक्रमामुळे तळजाई टेकडी परिसर स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचे भान निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा