व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, लोणावळा येथे एन.एस.एस. अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
लोणावळा दि. ०७ (प्रतिनिधी) येथील व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, लोणावळा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तुकडी BSF-142 अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसूरकर, प्रो. हुसेन शेख, प्रो. सोनी राघो, प्रो. सायली धारने तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. रोहित जगताप यांनीही वृक्षारोपण करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षारोपण केले. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या उपक्रमासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.




Comments
Post a Comment