कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘शिवजयंती’ मोठ्या उत्साहात साजरी

 


तळेगाव दाभाडे दि.२० (प्रतिनिधी) तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये  दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक चंद्रकांत काकडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगरसेविका मंगलताई काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे,संचालिका सुप्रिया काकडे संचालिका सोनल काकडे, शालेय मुख्याध्यापिका ज्योती सावंत, पर्यवेक्षिका शुभांगी वनारे, पर्यवेक्षिका कीर्ती कुलकर्णी, पर्यवेक्षिका श्रावणी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले. इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कु. तनुजा मराठे तिने आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली, तसेच इयत्ता सहावीतील विघ्नेश डाळिंबकर या विद्यार्थ्याने शिवनेरी किल्ल्यांचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच नर्सरी व सीनियर गटातील  श्रीशा पायगुडे व  कदम आराध्या या विद्यार्थिनींनी शिवगर्जना सादर केली. तसेच सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.


यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा घालून अष्टप्रधान मंडळाची कामगिरी आपल्या भाषेत सांगितली. काही विद्यार्थिनींनी बाल शिवाजीचा पाळणा  सादर केला शालेय मुख्याध्यापिका ज्योती सावंत यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचे धडे विद्यार्थ्यांना दिले.तसेच स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज त्यांची आदर्श शासन पद्धती जाणून त्या पद्धतीने काम करावे असे सांगितले. त्याचबरोबर नीतिमत्ता चारित्र्य व आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यास सांगितले.

यानंतर संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना ३९५ व्या शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून शिवरायांचे आचार विचार आपल्या आचरणात आणावे तसेच शिवरायांच्या कामाची पद्धत जाणून घ्यावी त्यांचे गुण आत्मसात करावे व सुट्टीच्या दिवशी गड किल्ल्यांना भेट देऊन त्यांची माहिती जाणून घ्यावी तसेच किल्ल्यांचे संवर्धन करावे व त्यांचे पावित्र्य राखण्यास सांगितले.


यानंतर ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. ‘ हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, ‘ अशा घोषणा सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने देत होते. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केलेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी श्रेया बाणेकर व अंजली नलगे यांनी केले कार्यक्रमास पालकवर्गही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश