महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळच्या अध्यक्षपदी राम कदमबांडे तर कार्यवाह पदी देवराम पारीठे

 

तळेगाव दाभाडे दि. 17 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळची सहविचार सभा नुकतीच ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली. यावेळी राम कदमबांडे यांची अध्यक्षपदी,देवराम पारीठे यांची कार्यवाह पदी तर कार्याध्यक्षपदी अशोक कराड यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी संपूर्ण नूतन कार्यकारीणी तयार करण्यात आली. 

यावेळी परिषदेचे जेष्ठ सल्लागार प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, रविंद्र शेळके, धनंजय नांगरे, माजी कार्याध्यक्ष भारत काळे,माजी अध्यक्ष लक्ष्मण मखर आदी उपस्थित होते. 



यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद पातळीवर पेन्शन केस, थकित बीले, मेडीकल बीले, शिक्षक कंत्राटी भरतीला विरोध करणे, शिक्षकेतर कर्मचारी रोस्टर पूर्ण करुन त्वरीत भरती सुरू करावी, विविध शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता तसेच शिक्षकांच्या फंडाच्या पावत्या मिळणे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना कदमबांडे म्हणाले की,मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील तसेच परिषदेचे  जास्तीत जास्त आजीव सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे 
अध्यक्ष- राम कदमबांडे, कार्यवाह- देवराम पारीठे, कार्याध्यक्ष - अशोक कराड, उपाध्यक्ष - सोपान  असवले, धनकुमार शिंदे, संदिप  क्षिरसागर,   वैशाली  कोयते, जिल्हा प्रतिनिधी- लक्ष्मण  मखर , सहकार्यवाह  - राजेंद्र भांड, कोषाध्यक्ष-गणेश  ठोंबरे, सह कोषाध्यक्ष - रियाज  तांबोळी,

संघटनमंत्री- निवास  गजेंद्रगडकर (लोणावळा), संतोष  बारसकर (अंदर मावळ), जीवन  वाडेकर (आंदर मावळ), गणेश  दातीर (पवन मावळ), सोमनाथ  साळुंके (नाणे मावळ), संजय  हुलावळे ( नाणे मावळ), समीर  गाडे ( तळेगाव), संपत गोडे ( तळेगाव)


सल्लागार संघटक- विलास  भेगडे, पांडुरंग पोटे, धनंजय  नांगरे, भारत काळे, रोहन  पंडीत, नारायण  असवले, नामदेव  गाभणे, संजय वंजारे, वशिष्ठ  गटकुळ,रविंद्र  शेळके, सोपान  ठाकर, गणेश  पाटील,  प्रसिद्धी प्रमुख- दिनेश  टाकवे, संजय पालवे, प्रकल्प प्रमुख-बाळू  पाचारणे, सुनिल  मंडलिक, सह प्रकल्प प्रमुख- राजकुमार  वरघडे 

महिला प्रतिनिधी- शितल शेटे,  शुभांगी  पवार, वैजयंती  कुल, कार्यकारिणी सदस्य- संभाजी  बो-हाडे, हसन  शिकलगार,  प्रविण  हुलावळे,   दिलीप  बिरंगळ,  सोमनाथ ढुमणे,  नरेंद्र  इंदापुरे बळीराम भंडारी, अनिल शिंदे, उमेश  इंगुळकर वैभव सुर्यवंशी

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश