जीवनात अडचणींवर मात करत पुढे जाणे महत्त्वाचे - रो.मिलिंद शेलार दि.०६ व ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे दोन दिवसाचा निवासी RYLA राजमाची किल्ला येथे घेण्यात आला.


तळेगाव दाभाडे : दि. ०७ (प्रतिनिधी) जीवनातील अडचणींवर मात करत, आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुढे जाणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे असलेल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि सतत शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांत रोटरी क्लब नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे. 


असे मार्गदर्शनपर उद्गार रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी काढले. ते रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने आयोजित अंध मुलांना स्पर्श अनुभूतीच्या विश्वाचा या कार्यक्रमांतर्गत ३२ अंध विद्यार्थ्यांसाठी RYLA राजमाची किल्ल्यावर दोन दिवसीय निवासी सहलीमध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. 



छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांची ओळख दिव्यांगाना व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या विचार, त्यांच्या प्रेरणा आयुष्यामध्ये घेऊन उत्तुंग यशाचे शिखर गाठावे यासाठी या सहलीचे आयोजन केले. असल्याचे रो.मिलिंद शेलार यांनी सांगितले. 


ममता अंध अनाथ कल्याण केंद्र पिंपळे गुरव येथील ३२ अंध विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहास अभ्यासक विजयकुमार जोरी यांनी विद्यार्थ्यांना सोपे भाषेत इतिहास समजावून सांगितला. दरम्यान राजमाची येथील गावकऱ्यांनी या मुलांचे अतिशय आदराने स्वागत करत राहण्याची व्यवस्था केली. या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले यामुळे वातावरण आनंददायी झाले होते. तुषार कांबळे यांनी रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी सारख्याच संस्थाच आमच्यासाठी काम करू शकतात. हे खूप अभिमानास्पद आहे. रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे सहकार्य नेहमीच असते. रोटरी क्लबच्या योगदानाबद्दल कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रकल्प प्रमुख रो. सुनील रहाटे, रो.पांडुरंग खांडवी आदींनी प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा