श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त 31 मार्चला पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन

तळेगाव स्टेशन दि. २८ (प्रतिनिधी ) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) स्वामी समर्थ सेवा केंद्र तळेगाव स्टेशन आयोजित स्वामी जयंती उत्सव व पालखी सोहळा परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपशिर्वादाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सोमवार दि. 31 मार्च 2025 रोजी पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन सप्तशृंगी माता मंदिर, इंद्रायणी कॉलनी, तळेगाव स्टेशन याठिकाणी केले आहे. अशी माहिती स्वामी समर्थ सेवा केंद्र तळेगाव स्टेशन व गणेश मोहनराव काकडे अध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठान तळेगाव स्टेशन यांनी दिली, तसेच परिसरातील सर्व माता-भगिनींनी व भाविक भक्तांनी पारायण व महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:
दुपारी 3:00 वाजता: श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन
दुपारी 3:45 वाजता: श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन व हवन
सायंकाळी 5 ते 8:30: पालखी सोहळा
रात्री 8:30 वाजता: आरती व महाप्रसाद 


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.



Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास