पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात महिला आघाडीवर जागतिकीकरणानंतरचा सर्वात मोठा सामाजिक बदल परिसंवादात वक्त्यांचे मत

 

पिंपरी दि. १३ (प्रतिनिधी) :  

 "जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात महिलांचे श्रमबळ दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढत आहे. आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण 35 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच, भारतीय प्रशासन सेवेत महिलांचा सहभाग 28 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ग्लोबलायझेशननंतर, मुलींनी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाला दिलेल्या प्रधान्यामुळे झालेला हा बदल आशादायक आहे." 

-डॉ. संदीप पाचपांडे, शिक्षणतज्ज्ञ



शिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकासाच्या जोपासलेल्या दृष्टीकोनामुळे महिलांनी स्वतःला सक्षम केले आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या क्षमतांना सिद्ध केले आहे. जागतिकीकरणानंतरचा हा सर्वात मोठा सामाजिक बदल असल्याचे मत महिला दिनानिमित्त येथे आयोजित परिसंवादात प्रमुख वक्त्यांनी मांडले.

शहरातील एएसएम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि  वुमन एम्पॉवरमेंट विभागातर्फे पिंपरी आयपीएस सभागृहात आयोजित 'जागतिकीकरण आणि महिला सबलीकरण' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा एएसएम टास्क फोर्स कमिटीचे संचालक डॉ. दत्तात्रय बाळसराफ होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जान्हवी कनोरे आणि आयपीएसचे अधिष्ठाता डॉ. विकास बरबटे यांनी परिसंवादात त्यांचे विचार मांडले.



गेल्या दहा वर्षात महिलांचा राजकारण, प्रशासन, व्यवस्थापन, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, व्यवसायिक, प्रशासन, लष्कर, व्यवस्थापन आणि औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात सहभाग आणि प्रभाव वाढला आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात सुमारे 35 टक्के महिलांनी कार्यक्षमतांना सिद्ध करून त्यावर मोहोर उमटवली आहे. पुढील दहा वर्षांत या क्षेत्रांवर महिलांची मक्तेदारी असेल, असे मत परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. डी. डी. बाळसराफ यांनी मांडले.



 डॉ. कनोरे यांच्या मते  समाजातील प्रमुख घटक म्हणून सुशिक्षित महिलांनी त्यांची ओळख निर्माण करण्याचे काम करून त्या कुठेही कमी नाहीत, ही बाब सिध्द केली आहे. परंतु अशिक्षित आणि अर्धशिक्षित महिलांबाबत आजही अनेक आव्हाने आहेत. यावेळी व्यासपीठावर  उपप्राचार्य डॉ. चंद्रशेखर सोनवणे, उपप्राचार्य सरिता गोयल,  उपप्राचार्य अर्चना वेदपाठक आदि उपस्थित होते.

प्रमुख वक्ते म्हणून डॉ.जान्हवी कनोरे यांनी महिला सक्षमीकरण हे तिच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आरोग्य याशिवाय शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी  सहाय्यक प्राध्यापक महिला, शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांनी  विचारलेल्या शंकांचे निरसन त्यांनी केले.  या कार्यक्रमास  प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा