भरत भिकाजी वरघडे यांचे दुःखद निधन



 तळेगाव दाभाडे दि. १५ (प्रतिनिधी) पवन मावळमधील आर्डव गावचे रहिवासी व तळेगाव दाभाडे येथील निवासी वारकरी संप्रदायातील हभप भरत भिकाजी वरघडे (वय ७१) यांचे शनिवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.


त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

भरत वरघडे पवन मावळ वारकरी दिंडी समाजाचे अनेक वर्ष विश्वस्त म्हणून राहिलेले आहेत. तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेत ३५ वर्ष लिपिक पदावर नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. 



अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा कोषाध्यक्षपदी म्हणून त्यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पाडली आणि सद्या सल्लागार म्हणून कार्यरत होते.

शिक्षक राजकुमार वरघडे, शिक्षक विजय वरघडे तसेच गुणवंत कामगार संजय वरघडे यांचे ते  वडील होत.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा