अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे ग्रंथालय दिन उत्साहात साजरा

 

वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे 12 ऑगस्ट 2025 रोजी श्री. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथालय दिन म्हणून साजरा करण्यात आला.



ग्रंथालय शास्त्राचे जनक श्री. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळावा म्हणून खूप मोठे योगदान दिले  म्हणून  त्यांची जयंती ग्रंथालय दिन म्हणून साजरी केली जाते.



 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. जाधव सुजाता यांनी केले. श्री. एस. आर. रंगनाथन यांची संपूर्ण माहिती प्रा. सुप्रिया पाटोळे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी रामकृष्ण मोरे कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. विक्रांत शेळके यांनी ग्रंथ ग्रंथालयाचे वाचन व महत्व  याबद्दल व्याख्यान दिले.



 या कार्यक्रमास कला वाणिज्य महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रा.अशोक गायकवाड,  अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता धायगुडे प्रा. सांगळे महादेव, प्रा. डॉ. तोटे कविता, प्रा. डॉ. देवळाकर शीतल, प्रा. रणदिवे प्रा. डॉ.संदीप गाडेकर, प्रा. पाटील सोनाली, प्रा. शबाना मोकाशी, प्रा. डॉ. दीपा नेवसे,  प्रा. संध्या घोडके, कला, वाणिज्य व बी.बी. ए. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, तसेच सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा