अध्यापक महाविद्यालयचे विशेष श्रमसंस्कार शिबिर कार्ला येथे संपन्न

 


कार्ला दि. 16 (प्रतिनिधी) वडगाव मावळ येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यापक महाविद्यालयचे आयक्यूएसी अंतर्गत दोन दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 15 व  16 मार्च 2025 रोजी कार्ला ता. मावळ येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे संयोजन समाजसेवा विभाग प्रमुख डॉ. शीतल देवळालकर यांनी केले.  शिबिराचे उद्घाटन कार्ला गावच्या  सरपंच दीपालीताई हुलावले आणि उपसरपंच अभिषेक जाधव यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सोनाली गोरे व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पहिल्या दिवशी गावातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, तळ्याजवळील महादेव मंदिर परिसरातील साफसफाई करून फुलझाडे लावण्यात आली. दुपारच्या सत्रात  हकदर्शक कंपनीचे वतीने निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले.


 संध्याकाळचे सत्रात सर्पमित्र अतुल सव्वाखंडे, व त्यांचे सहकारी पाटील यांनी सर्प : समज व गैरसमज याबाबत विद्यार्थ्यांना उद्बोधन केले तसेच अंधश्रद्धा निर्मूलन बाबत काही वैज्ञानिक प्रयोगाद्वारे  प्रात्यक्षिके करून दाखविली. संध्याकाळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.



    दुसऱ्या दिवशी सकाळी योगासने व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यानंतर गावातील मारुती मंदिर, ग्रामपंचायत, महादेव मंदिर व जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यासाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. 

शिबिरातील शेवटचे पुष्प लिली इंग्लिश माध्यम शाळेचे मुख्याध्यापक चेतन देशमुख यांचे भावी शिक्षक आणि समाजभान या विषयावर  मार्गदर्शन झाले.



शिबिराच्या समारोपासाठी सरपंच दीपालीताई हुलावळे व उपसरपंच अभिषेक जाधव उपस्थित उपस्थिती होते.  यावेळी  शिबिरातील विद्यार्थी अथर्व गरुड व रेश्मा चव्हाण यांनी आपले अनुभव कथन केले. शिबिरास माजी विद्यार्थी संतोष हुलावळे व संजय हुलावळे यांनी भेटी दिल्या.


सदर शिबिरासाठी प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे, सहा. प्रा महादेव सांगळे, डॉ. कविता तोटे, डॉ संदीप गाडेकर, सहा. प्रा. ज्योती रणदिवे, सहा. प्रा. सोनाली पाटील, सहा. प्रा. शबाना मोकाशी, ग्रंथपाल सुजाता जाधव आणि एम. एड. विभागातील डॉ. दीपा नेवसे व सहा. प्रा. संध्या घोडके तसेच  मोहन कडू, सुरेश घोजगे, विनायक येळवंडे, संतोष ढमाले यांचेसह विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.शिबिर व्यवस्थित पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोकजी बाफना यांनी कौतुक केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास