खडकीचे विद्यार्थी स्वामी विवेकानंदांचे भाषण पाठ करणार - जयंत रानडे

 


 खडकी दि. 18 (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील जगदविख्यात भाषणाच्या शताब्दी निमित्ताने खडकी शिक्षण संस्थेच्या, टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाने शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषण कृती कार्यक्रम-कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून भाषण,पाठांतर,लेखन कौशल्य आत्मसात केली. जयंत रानडे यांनी  विद्यार्थ्यांच्या कौशल्याधिष्ठित उपक्रमांना महत्त्व देऊन भाषणासारख्या कलेकरीता ही कार्यशाळा घेतल्याचे नमूद केले.


११ सप्टेंबर ते १२जानेवारी या कालावधीत विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद शिकागो भाषण कृती समितीच्या साह्याने समितीचे प्रमुख जयंत रानडे आणि समितीच्या आयोजनातून खडकी शिक्षण संस्थेच्या सहकार्यातून अतिशय यशस्वीतेने ही डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनालहाली कार्यशाळा पार पडली.  उपप्राचार्य प्रा.राजेंद्र लेले यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. 


कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना प्रमुख अतिथी वक्ते कृती कार्यक्रमाचे संयोजक जयंत रानडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून कृतीशील भाषण प्रक्रिया समजून सांगितली. समाजातील अनेक प्रश्नांचे मूळ ' स्व'चा बोध नसणे,'स्व'राष्ट्राचा बोध नसणे व सर्व मानव सुखी होतील यासाठी कृतिशील मूल्यांची जपणूक करणे यात असते. असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार आनंद नाईक यांनी मांनले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास