तळेगाव दाभाडे दि. 28 (प्रतिनिधी) शिक्षणाच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मावळ तालुक्यातून जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी म्हणून श्लोक संतोष भारती याची निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे केवळ कुटुंब, शिक्षक आणि शाळाच नव्हे, तर संपूर्ण मावळ तालुका आणि जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब
जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात, मात्र जिल्ह्यातून केवळ ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अशा परिस्थितीत मावळ तालुक्यातून मुलांमध्ये एकमेव ब्राह्मणवाडी (साते) जिल्हा परिषद शाळेचा श्लोक संतोष भारती याने यश मिळवले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे ब्राह्मणवाडी (साते ) गावासह संपूर्ण मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
शिक्षक आणि पालकांचे विशेष योगदान
श्लोक यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीसोबतच त्यांचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचेही मोठे योगदान आहे. श्लोक यांचे वडील संतोष भारती सर आणि आई श्वेता भारती मॅडम हे दोघेही शिक्षक असल्यामुळे श्लोकला शिक्षणाची योग्य दिशा मिळाली. वर्गशिक्षिका अश्विनी पाटील मॅडम यांनी संपूर्ण वर्षभर त्याला मेहनत करून परीक्षेसाठी तयार केले. मुख्याध्यापिका सरिता पवार मॅडम आणि केंद्रप्रमुख काळे मॅडम, विस्तार अधिकारी शोभा वहिले मॅडम, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज साहेब व गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान साहेब यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्लोकला अभ्यासासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून दिले. तसेच शालेय समिती अध्यक्ष आनंद नवघणे , उपाध्यक्ष सौ.रसिकाताई सर्व शा.व्य.समिती सदस्य यांनी श्लोकच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शाळेच्या संपूर्ण स्टाफचे आभार मानले.
संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव!
श्लोकच्या यशाची बातमी समजताच गावकऱ्यांसह संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षक, शाळेचे माजी विद्यार्थी, स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्याच्या या ऐतिहासिक यशाचे कौतुक केले आहे.
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
श्लोक भारतीच्या या यशामुळे ब्राह्मणवाडी जि.प.शाळेचा गौरव वाढला आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत असून, भविष्यात तो आणखी मोठे यश संपादन करेल असा विश्वास शिक्षक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.
Comments
Post a Comment