टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी, पुणे. भूगोल विभाग आयोजित एकदिवशीय शैक्षणिक सहल संपन्न
पुणे दि. २६ (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी, पुणे. भूगोल विभाग आयोजित एकदिवशीय शैक्षणिक सहल शैक्षणिक वर्ष 2024-25. ही रविवार दिनांक 23/03/2025 रोजी भोर, मांढरदेवी काळुबाई, वाई, प्रतापगड, महाबळेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या सहलीमध्ये भूगोल विभागाचे एकूण 38 विद्यार्थी सहभागी झाले होते. शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल विषय अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला.
या अभ्यास सहलीमध्ये विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची चौफेर माहिती देण्याचे काम करण्यात आले. विद्यार्थ्यांना भूगोल विषय प्रत्यक्ष फिल्ड वरती जाऊन अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दलची सखोल माहिती भेटू शकते तसेच विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे क्षेत्र अभ्यास केल्यामुळे भूगोल विषयाची आवड निश्चितच निर्माण होईल. विद्यार्थ्यांना या सहलीमध्ये वेगवेगळे विषय तसेच सहल नियोजन, सहल आयोजन कशा पद्धतीने केले जाते व कोणत्याही ठिकाणी गेल्यावर भौगोलिक दृष्टिकोनातून आपल्या विषयाशी संबंधित त्या ठिकाणाचा काय सहसंबंध आहे याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करणे व विषय ज्ञान वाढवण्यासाठी तसेच दररोजच्या नियमित उपक्रमा ऐवजी एक नवीन उपक्रम म्हणून सहल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमाला खडकी शिक्षण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल यांच्या माध्यमातून खडकी शिक्षण संस्थेला मिळालेल्या बसनेच सहलीचा प्रवास करण्यात आला. खडकी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, उप प्राचार्या डॉ. सुचेता दळवी, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले, यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले, भूगोल विभागाच्या वतीने भूगोल विभाग प्रमुख डॉ. निलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल समन्वयक म्हणून डॉ. दिपाली औसरमल, प्रा. शुभम पटारे, प्रा. कांचन पाटील, एकूणच भूगोल विभागातील प्राध्यापकांनी सहल यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले. तसेच संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन आहेर, प्रा. भागवत शिंदे, बस ड्रायव्हर संतोष जगदने, यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच भूगोल विभागातील विद्यार्थ्यांचे सहल यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.
Comments
Post a Comment