तळेगावात महिलादिन कवी संमेलनाने साजरा

 

तळेगाव दाभाडे दि. 8 (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील कालेकर एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित काव्य संमेलनात आज रोजी महिला कवियत्री आणि पुरुष कवींनी सहभाग नोंदवला. संस्थेच्या अध्यक्षा पूनम श्रीवल्लभ कालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी सर्व क्षेत्रात आज प्रगती केलेली आहे आणि तिची घोडदौड निरंतर चालू आहे वेगवेगळ्या रूपात ती आज आपले कर्तव्य बजावत आहे आणि आजचा जागतिक महिला दिवस हा केवळ महिलांचा सन्मान नसून तसे पहिले तर संपूर्ण परिवाराचा सन्मान आहे असे प्रतिपादन केले. 


संस्थेचे सेक्रेटरी श्रीवल्लभ कालेकर यांनी आपले विचार व्यक्त करत असताना सांगितले की जागतिक महिला दिवस फक्त महिलांनी एकत्र येऊन साजरा करण्यापेक्षा पुरुषांनी सुद्धा महिलांचे कौतुक  त्यांच्यासमोर केल्यास त्यांना एक वेगळेच प्रोत्साहन मिळेल या दृष्टीने पुरुष कवींना सुद्धा येथे आमंत्रित केले गेले आहे.

त्याचबरोबर उपस्थित कवींनी आपल्या विविध काव्यरचनेमधून महिलांचे गुणगौरव सादर केले, याप्रसंगी कोणी आईचे कोणी बहिणीचे तर कोणी मुलींचे कौतुक करत असताना कोणत्याही परि पेक्षा आपली बायकोच बरी असेही आपल्या कवितेमधून मनोगत व्यक्त केले.


अमृता गायकवाड यांनी स्त्री भृणहत्येविषयी एक व्याख्यान दिले तर तर ज्येष्ठ गीतकार फडणीस यांनी आपल्या वेगळ्या शैलीमध्ये एक गीत सादर केले. 

याप्रसंगी अनघा कुलकर्णी, छाया फडणीस, नंदिनी काळे, मीरा इनामदार, अमृता गायकवाड, प्रियंका खटावकर, श्रीराम घडे , मोहन जाधव, शरदेंदु शुक्ला, श्रीकृष्ण पुरंदरे, त्रिंबक बिनीवाले असे विविध कवी व कवियत्री उपस्थित होते. 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा