एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेजला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 


 आळंदी दि. 4 (प्रतिनिधी ) नुकताच थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार  सोहळ्यामध्ये  माईर्स, एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज, आळंदी , पुणे यांना सर्वोत्कृष्ट  शिक्षक शिक्षण महाविद्यालय  हा पुरस्कार प्राप्त झाला.   



हा पुरस्कार विविध निकषांवर आधारित दिला जातो, यामध्ये शैक्षणिक उत्कृष्ट कामगिरी,  शैक्षणिक उपलब्धी,  महाविद्यालयातील  भौतिक साधन सुविधा याचबरोबर विद्यार्थी शिक्षकांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी असलेले अध्ययनक्षम वातावरण,  नाविन्यपूर्ण कल्पना,  विद्यार्थी उत्तीर्ण प्रमाण व महाविद्यालयाने राबवलेले सामाजिक बांधिलकीचे उपक्रम या निकषांचा  आधारावर महाविद्यालयाची निवड करण्यात येते. एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेजची निवड ही या निकषांवर होवून यंदाचा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट  शिक्षक-शिक्षण महाविद्यालयाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.



 मागील वर्षी झालेल्या नॅक मूल्यांकन  प्रक्रियेत  ‘ए’ श्रेणी (  3.10 )  प्राप्त झालेली होती.   तसेच आळंदी मध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या आध्यात्मिक साहित्य संमेलनामध्ये महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जगातील  सर्वात वजनदार राखीच्या निर्मितीमुळे  महाविद्यालयाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यात आलेले आहे. यापूर्वी राज्य व राष्ट्रीय असे ५ पुरस्कार महाविद्यालयाला मिळाले असून महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षकांना पुणे परिसरातील शाळा-विद्यालयांमध्ये अत्यंत मागणी आहे. मागील महिन्यात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या “ राष्ट्रस्तरीय मूल्यशिक्षणावर आधारित खेळ” स्पर्धेत महाविद्यालयीत विद्यार्थ्यांना बक्षीसे प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वातीताई कराड- चाटे यांनी प्राचार्य डॅा. सुरेंद्र हेरकळ व सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी-शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा