कर्करोगाचे वेळेत निदान झाले तर प्रभावी उपचार होऊ शकतात - रो.मिलिंद शेलार

 


तळेगाव दाभाडे दि. 28 (प्रतिनिधी): आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे आजची छोटीशी काळजी उद्याच्या मोठ्या संकटातून आपल्या संरक्षण करू शकते आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाले असताना देखील कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे त्यासाठी कर्करोगाचे वेळेत निदान झाले तर प्रभावी उपचार होऊ शकतात असे प्रतिपादन रो. मिलिंद शेलार यांनी केले.


ते रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग प्रतिबंधात्मक तपासणी शिबिराचे मावळ तालुक्यातील दुर्गम सांगीसे गावामध्ये आयोजित शिबिरात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.



यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व टी.जी.एच.ऑन्को  लाइफ कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे यांचा संयुक्त विद्यमाने  तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयमुखाचा कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात आली.


या उपक्रमाचा उद्देश कर्करोगाचे लवकर निदान करून  महिलांना   आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. टीजी एच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या तज्ञ डॉ.सिमरन थोरात, नम्रता यादव  व त्यांच्या टीमने उपस्थित महिलांची तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद लाभला तपासणीसाठी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व टी.जी.एच.ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांनी भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रथम नागरिक सरपंच सुनीता योगेश शिंदे तसेच रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख रो. सुमती निलवे,रो.ज्योती नवघणे, रो. सुवर्णा मते, रो. उमा पवार, रो, जगन्नाथ काळे, यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्र सूत्रसंचालन केंद्रप्रमुख सुहास धस यांनी केले तर आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रवींद्र जाधव यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास