कर्मसिद्धी पुरस्काराने होणार महिलांचा सन्मान


तळेगाव दाभाडे दि.6 (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन आणि अरुण्यम् कोंडीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा कर्मसिद्धी पुरस्काराने सन्मान होणार आहे. रविवारी (दि.०९) सकाळी दहा वाजता बाल विकास शाळेजवळील नाना - नानी पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे आणि सचिव केदार शिरसट यांनी दिली.

या कार्यक्रमाला श्रीमंत याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार आणि ह. भ. प. जयश्रीताई येवले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी उपनगराध्यक्ष , उद्योजक गणेश काकडे हे भूषविणार आहेत.


यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक, रेणुका भजनी मंडळ, स्वामी समर्थ सेवा केंद्र, मनकर्णिका बचत गट, इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे या संघटनांना कर्मसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सुमन कोतुळकर (अध्यात्म), नलिनी राजहंस (वाड्मय ), वर्षा थोरात - काळे (शैक्षणिक), शालिनी झगडे (क्रीडा), डॉ. प्रिया बागडे (वैद्यकीय), अनघा बुरसे (सांस्कृतिक), वृषाली टिळे (सामाजिक), ममता राठोड (प्रशासकीय), लता ओव्हाळ (आदर्श व्यक्तिमत्व), सलीमा शेख (आदर्श माता), कविता मोहमारे (संघटन कौशल्य) यांचा कर्म सिद्धी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा