चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मरणार्थ विज्ञानदिनानिमित्त विज्ञान व कला प्रदर्शनाचे भव्य आयोजन

 


       तळेगाव दाभाडे दि.१ (प्रतिनिधी ) श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये दि.28 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मरणार्थ विज्ञान दिनानिमित्त कला व विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले.


          कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी पंचायत समिती मावळ नानाभाऊ शेळकंदे, अजिंक्य खांडगे व वसुंधरा खांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

      प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी श्री. नानाभाऊ शेळकंदे, श्री.अजिंक्य खांडगे यांचा स्वागतपर सत्कार रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार यांनी केला. वसुंधरा खांडगे यांचा स्वागतपर सत्कार सल्लागार कुसुमताई वाळुंज यांनी केला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट यांनी केला.



      विज्ञान ,कला प्रदर्शनाद्वारे मुलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन  देण्याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रास्ताविकातून शालेय मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट यांनी प्रतिपादन केले.



      कला व विज्ञान प्रदर्शनास प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी नानाभाऊ शेळकंदे, रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, संचालक रामराव जगदाळे,  अजिंक्य खांडगे व वसुंधरा खांडगे, सल्लागार कुसुमताई वाळुंज, शालेय मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट, पर्यवेक्षिका रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

      आयुष्य हेच विज्ञान असून कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन संशोधक बनता येते असे मार्गदर्शन सौ.वसुंधरा खांडगे यांनी विद्यार्थ्यांना केले‌.

       महान शास्त्रज्ञ,कलाकार यांच्याकडून प्रेरणा घेऊन कल्पनाशक्तीच्या जोरावर आजचे बालसंशोधक उद्याचे शास्त्रज्ञ नक्कीच होतील असा विश्वास आपल्या मनोगतातून रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार यांनी व्यक्त केला.

        अज्ञान सोडून विज्ञानाची कास धरावी व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती करून संशोधनातून प्रगतीची साधावी  असा कानमंत्र प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी नानाभाऊ शेळकंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 


    तद्नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते विज्ञान व कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. बालसंशोधकांनी अफलातून प्रयोग व चित्रकला, हस्तकला सादर केली. दैनंदिन जीवनाशी निगडित ते अत्याधुनिक अंतराळयाना पर्यंत सर्व गोष्टी विज्ञान व कला प्रदर्शनातून मांडण्यात आल्या.या प्रसंगी सर्व मान्यवर आणि पालकांनी विज्ञान व कला दालनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विज्ञान व कला प्रदर्शनात विद्यालयातील सर्व बालसंशोधकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

      कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट,पर्यवेक्षिका रेणू शर्मा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नेकपरविन लोकापूर व अश्विनी जोशी यांनी केले.

        या स्तुत्य प्रदर्शनाचे कौतुक श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले. तसेच बाल संशोधकांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा