संपर्क बालग्राम अनाथांची मायबाप संस्था: चित्रा जगनाडे

 


तळेगाव दाभाडे : दि.10 (प्रतिनिधी) गेल्या तीन दशकात दहा हजारावर निराधार मुलामुलींसाठी काम करत असलेली संपर्क बालग्राम संस्था अनाथांची मायबाप असून संस्थापक अमितकुमार बॅनर्जी आणि रत्ना बॅनर्जी यांनी आईवडिल म्हणून भूमिका निभावली आहे. समाजाने त्यांच्या या कार्यात भरभरून योगदान द्यावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी शनिवारी (दि. ८) केले. 


बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे महिला दिनानिमित्त संचालक मंडळाने मळवली संपर्क बालग्रामला भेट देत तेथील मुलींशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पतसंस्थेतर्फे संपर्क संस्थेस आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्ष मीनल फाकटकर,  संचालिका शीतल उबाळे, सुनीता कर्पे, प्रियांका साठे आणि व्यवस्थापक सुवर्णा लाखे  उपस्थित होते. संपर्क बालग्रामच्या संस्थापक सचिव रत्ना बॅनर्जी यांनी स्वागत केले. 30 महिलांना साड्या आणि मुलींना खाऊवाटप केले. मुलींचे संगोपन ही अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक जबाबदारी बॅनर्जी यांनी 35 वर्षांपासून निभावल्याबद्दल त्यांचा सन्मान माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आला. बालग्रामच्या  मुलींनी यावेळी त्यांचा गायन संगीतावर आधारित कार्यक्रम सादर केला. 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा