कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 'छावा' चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर ऐतिहासिक मूल्यांची रुजवणूक



तळेगाव दाभाडे दि. 6 (प्रतिनिधी ) दिनांक ४ मार्च  रोजी तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयावर 'छावा' चित्रपट दाखवण्यात आला. 


या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनशैलीचे दर्शन झाले.छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत 125 यशस्वी लढाया लढले.त्या काळात ते एक कुटुंब प्रमुख, पती म्हणून, पिता म्हणून,मुलगा म्हणून राजा कसे होते हे समजते. छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र हे खूप प्रेरणादायी आहे.त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला त्याग त्याच बरोबर त्यांच्या सोबतीला असणारे मावळे या सर्वांच्या बलिदानाचे महत्त्व यातून समजले. हा चित्रपट पाहून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य  दाखविताना  त्यांच्या निस्वार्थ वृत्तीचे दर्शन घडते. या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये इतिहासाविषयी प्रेम निर्माण झाले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी हा चित्रपट पाहून भारावून गेली. 


या चित्रपटांमध्ये दाखवलेला इतिहास, लढायांचे प्रसंग आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याचा अखेरचा काळ किती भव्यदिव्य स्वरूपात होता हे समजते. चित्रपट संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून मोठ्या आवाजात शिवगर्जना म्हणायला सुरुवात केली. अनेक विद्यार्थी भावूक देखील झाले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा