रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान


  तळेगाव दाभाडे दि. 8 (प्रतिनिधी) श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 8 मार्च 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

    कार्यक्रमाची सुरुवात  रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.


   अबला नारी सबला झालेली असून महिला सशक्तिकरणास प्रोत्साहन देण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकातून शालेय मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट यांनी वक्तव्य केले.

   महिलांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.मिलिंद शेलार, रो.संदीप मगर,रो.विलास टकले, शालेय मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट, पर्यवेक्षिका रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.


     तंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्याकरिता डिजिटल सखीच्या माध्यमातून महिलांसाठी तंत्रज्ञानयुक्त व्यासपीठ महिला दिनानिमित्त उपलब्ध करून 'डिजिटल सखी' बाबत मार्गदर्शन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे रो.संदीप मगर यांनी केले.

      समाज उभारणी, विद्यार्थ्यांची जडणघडण ,भावी पिढीच्या उज्वल भविष्याकरिता महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे  वक्तव्य रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.मिलिंद शेलार सर यांनी केले.

        स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शालेय शिक्षक श्री‌.विजय जाधव यांनी केले.

    या स्तुत्य उपक्रमाचे  श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींनी कौतुक करून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा