आई-वडिलांप्रमाणे सासू-सासर्‍यांची काळजी घेतल्यास वृद्धाश्रम बंद होतील- गणेश काकडे

 


कर्मसिद्धी पुरस्कार वितरण प्रसंगी याज्ञसेनीराजे दाभाडे , हभप. जयश्रीताई येवले, गणेश काकडे व मान्यवर

तळेगाव दाभाडे दि. १० (प्रतिनिधी) : महिला अबला नाहीत, तर त्या सबला आहेत. त्यांनी त्यांच्या आई- वडिलांप्रमाणे सासू-सासर्‍यांची काळजी घेतली, तर वृद्धाश्रम ही संकल्पना बंद होईल, असे मत माजी उपनगराध्यक्ष, उद्योजक गणेश काकडे यांनी केले. 


तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन आणि अरुण्यम् कोंडीवडेतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर श्रीमंत याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार , ह.भ.प. जयश्रीताई येवले, ज्येष्ठ पत्रकार पं. सुरेश साखळकर, प्रेस  फाउंडेशनचे संस्थापक विलास भेगडे,अध्यक्षा रेश्मा फडतरे, संस्थापक अध्यक्ष अमीन खान, उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, सचिव केदार शिरसट, कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे, प्रकल्प प्रमुख प्रा. नितीन फाकटकर, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे  आदी उपस्थित होते.

 याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार म्हणाल्या, समाजपरिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे.महिलांनी सर्वच क्षेत्रात उठावदार कामगिरी बजावली आहे. मासाहेब जिजाऊ ते सावित्रीबाई फुले असा मोठा वारसा महिलांच्या कर्तबगारीचा आहे.


आपल्या मधुर वाणीने ह.भ.प. जयश्रीताई येवले यांनी कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले. अनेक दाखले देत समाज प्रबोधन केले.महिला संत परंपरा विशद केली. याज्ञसेनीराजे दाभाडे आणि ह.भ.प. जयश्रीताई येवले यांनी प्रेस फाउंडेशन राबवीत असलेल्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. 

गणेश काकडे म्हणाले, आजपर्यंच्या इतिहासात भारतीय महिलांना मान दिला आहे. त्यांचा सन्मान केला आहे. महिला चांगल्या प्रकारे अर्थखाते सांभाळू शकतात. पण हल्लीच्या मुलींच्या लग्ना‌विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. त्या त्यांनी कमी कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी योगेश्वर माडगूळकर, सचिन शिंदे, मंगेश फल्ले, सागर शिंदे, डॉ.संदीप गाडेकर, सुरेश शिंदे, मयूर सातपुते तसेच मावळ तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.


स्वागत रेश्मा फडतरे यांनी तर प्रास्ताविक प्रा.नितीन फाकटकर यांनी केले. सूत्रसंचालन रमेश फरताडे  व केदार शिरसट यांनी केले.  अमीन खान यांनी आभार मानले. 

 कर्मसिद्धी पुरस्कारार्थी:
दामिनी पथक, रेणुका भजनी मंडळ, स्वामी समर्थ सेवा केंद्र, मनकर्णिका महिला महासंघ, इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे , सुमन कोतुळकर (अध्यात्म), नलिनी राजहंस (वाड्मय ), वर्षा थोरात - काळे (शैक्षणिक), शालिनी झगडे (क्रीडा), डॉ. प्रिया बागडे (वैद्यकीय), अनघा बुरसे (सांस्कृतिक), वृषाली टिळे (सामाजिक), ममता राठोड (प्रशासकीय), लता ओव्हाळ (आदर्श व्यक्तिमत्व), सलीमा शेख (आदर्श माता), कविता मोहमारे (संघटन कौशल्य)

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा