कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त एक नाविन्यपूर्ण उपक्रम

                        


तळेगाव दाभाडे दि. 8 (प्रतिनिधी) 8 मार्च 2025 रोजी तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक मा.श्री. चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, संचालिका सोनल काकडे, मुख्याध्यापिका ज्योती सावंत, पर्यवेक्षिका शुभांगी वनारे, पर्यवेक्षिका कीर्ती कुलकर्णी, पर्यवेक्षिका श्रावणी देसाई, उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर इयत्ता सातवी मधील कु. त्रिशा भेगडे या विद्यार्थिनीने जागतिक महिला दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच इयत्ता सातवीतील कु.मनस्वी सत्रे या विद्यार्थिनीने 'सावित्रीबाई फुले' यांची वेशभूषा धारण करून त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. कु.सौम्या कुंभार या सातवीच्या विद्यार्थिनीने 'राणी लक्ष्मीबाईंची' वेशभूषा धारण करून त्यांच्याविषयीचे मनोगत सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, एक स्त्री म्हणजे एक आई, एक बहीण, एक मुलगी, एक पत्नी अशा अनेक कणखर भूमिकांमध्ये ती आपले जीवन समृद्ध करत असते. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारामन यासारख्या महिला मुळे आपल्याला प्रेरणा मिळते. तसेच महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही तर ही एक संस्कृती असली पाहिजे व सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


यानंतर संस्थेच्या संचालिका सोनल काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लहान मुलीचे निरागसपण ,आईची आपल्या मुलांप्रती असलेली काळजी, आजीचे आपल्या नातवंडा प्रति असलेले प्रेम, एका पत्नीचे कर्तव्य अशा अनेक वेगवेगळ्या भूमिकेत ती सामर्थ्याने न डगमगता आपले कर्तव्य ती पार पाडत असते.तसेच सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर शालेय मुख्याध्यापिका ज्योती सावंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शिक्षण,विज्ञान, क्रीडा,व्यवसाय,प्रशासन अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप त्या उमटवत आहेत. असे म्हणून त्यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



 यानंतर शाळेतील मुख्याध्यापिका ज्योती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शाळेतील पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. या सर्व पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे यांनी केला. तसेच सर्व शिक्षिकांचा व शिक्षिकेतर कर्मचारी महिलांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षिका प्रगती काळे यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा