महावाचन महोत्सव 2025 वराळे येथे उत्साहात संपन्न


तळेगाव दाभाडे दि.१२ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत मावळ पंचायत समितीच्या वतीने आयोजित ‘महावाचन महोत्सव 2025’ दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वराळे, ता. मावळ, जि. पुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व्हावा, त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय श्री. कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सेवक थोरात, गटशिक्षणाधिकारी श्री. सुदाम वाळुंज, कुसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. मुकुंद तनपुरे, ग्रामविकास अधिकारी श्री. अरुण सोळंके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय थरकुडे, उपाध्यक्ष श्री. योगेश घोंगे, व सदस्य श्री. उमेश भांगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गटविकास अधिकारी श्री. कुलदीप प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या महावाचन उपक्रमात त्यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण झलक म्हणजे विद्यार्थ्यांनी ‘महावाचन’ या शब्दाची बैठक रचना साकारत केलेली वाचन व्यवस्था. या रचनात्मक बैठकीत विद्यार्थ्यांनी अनुशासनात बसून वाचन केले. ही दृश्यात्मक कलाकृती पाहून उपस्थित सर्व मान्यवरांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती उज्वला साळुंखे व श्री. रमेश गायकवाड सर यांनी आपल्या भाषणांतून वाचन संस्कृतीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष भारती यांनी केले, तर मुख्याध्यापिका सौ. पंकजा गुंडा मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका पंकजा गुंडा मॅडम  यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती उज्वला साळुंखे, अशोक बारवे, गंगाराम शेळके, आराधना जोशी, रमेश गायकवाड, नीलिमा कदम, संतोष भारती, नलिनी नांद्रे, सुरेखा पडवळ, मंगल जगदाळे, दुर्गा ठाकरे, योगेश ठोसर आदी शिक्षकांचे विशेष योगदान लाभले.

हा उपक्रम वाचन संस्कृतीचा उत्सव ठरून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, शिक्षकांच्या एकजुटीचा आणि प्रेरणादायी विचारांचा संगम ठरला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा