तळेगाव येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न श्री स्वामी समर्थांच्या पालखी दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर

 


तळेगाव दाभाडे दि.31 (प्रतिनिधी) स्टेशन भागात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जयंती उत्सव सोहळा माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे मार्गदर्शना नुसार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

 श्री सप्तशृंगी  माता मंदिरात श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन,श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे वाचन व हवन, आरती व महाप्रसाद आदी धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच श्री सप्तशृंगी माता मंदिरा पासून  इंद्रायणी वसाहत, आनंद नगर, वनश्री नगर, मनोहर नगर, श्री स्वामी समर्थ मंदिर, सिम्को कॉलनी, मोहन नगर परत सप्तशृंगी माता मंदिर असा पालखी मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात  पार पडला.पालखी मार्गावर अनेक  भाविकांनी दर्शनाचा आणि पालखी खांद्यावर घेवून सारथ्य करण्याचा  लाभ घेतला पालखी बरोबर चालण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यामध्ये महिला भाविकांचाही सहभाग लक्षणीय होता. पालखी समोर आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती आणि  पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात येत होता.

पालखी मार्ग  आकर्षक  रांगोळी काढून सुशोभित  केला होता. जागोजागी पालखीचे पूजन आणि स्वागत करण्यात येत होते.पालखी मार्गावर फटाक्यांची आतषबाजी होत होती. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष  गणेश काकडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे, किरण काकडे, राजेंद्र दाभाडे, रोहीत लांघे, किरण काकडे, नितीन दाभाडे, सुनील दाभाडे, शेखर मु-हे,अनिल वेदपाठक,प्रेस फाउंडेशनचे पत्रकार आदी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.श्री सप्तशृंगी माता मंदिरात पालखी आल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी नाना कारके, निखिल भगत, संवित पाटील उपस्थित होते.नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.उत्सवाचे नियोजन सिध्दीविनायक प्रतिष्ठान अध्यक्ष  सारिका काकडे यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास