तळेगावात भगवान महावीर जयंती उत्साहात महिलांचा सहभाग लक्षणीय; सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यानातून महावीर कल्याणक महोत्सव साजरा


तळेगाव दाभाडे, दि. १० (प्रतिनिधी) येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंडळातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव गुरुवारी भक्तिभाव, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक ऐक्य याच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.


छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चाफेकर सांस्कृतिक सभागृह पर्यंत भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. “भगवान महावीर की जय”, “अहिंसा परमो धर्म की जय” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. दिगंबर जैन महिला मंडळातर्फे सामूहिक मंत्रजप करण्यात आला.


जलाभिषेक, पंचपूजा आणि पाळणा विधी या धार्मिक विधींमध्ये महिलांनी पुढाकार घेतला. मनीषा गांधी, माधुरी साखरे, किरण चिवटे, तृप्ती पलसे, क्षमा फलटणे, स्वप्नाली सोनटक्के, वर्षा देवधरे व इतर सखींनी "णमो अरिहंताणं, णमो सिद्धाणं..." अशा नवकार महामंत्राचा सामूहिक पठण केले. मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे, उपाध्यक्ष प्रकाश चिवटे, कार्याध्यक्ष डॉ. शरद सोनटक्के, प्रा. प्रदीप फलटणे आणि सुधीर सपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले.

महावीरांचा समतेचा संदेश काळाची गरज : प्रा. फलटणे

जैन धर्म व बहुजन समाज विषयावर जैन अल्पसंख्याक समाजाचे अभ्यासक प्रा. प्रदीप फलटणे यांचे व्याख्यान झाले. भगवान महावीर यांनी सामाजिक समतेचा विचार मांडल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, की महावीरांनी तत्कालिन समाजव्यवस्थेतील विषमता, भेदभाव आणि अमानवीय प्रथांना मोडीत काढून मानवता आणि शांतीचा संदेश दिला. त्याचे अनुसरण करणे ही काळाची गरज आहे. जैन धर्माचे अभ्यासक सुधीर सपाटे यांनी भगवान महावीरांची जन्मगाथा सांगितली.


प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. शरद सोनटक्के यांनी केले. मंडळातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सचिव जिनचंद्र पलसे, महावीर शेटे, जिनेश्वर चिंचवडे, दीपक साखरे, प्रदीप ढोकर, राजकुमार देवधरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रकाश चिवटे यांनी आभार मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा