अंकुश लक्ष्मण येवले यांना वाघजाई माता बोडशीळ आदर्श शिक्षक ग्रामगौरव पुरस्कार

 

तळेगाव दाभाडे दि. 13 (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी (शिवली) येथील मुख्याध्यापक अंकुश लक्ष्मण येवले यांना "वाघजाई माता बोडशीळ आदर्श शिक्षक ग्रामगौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

    येवले हे तात्पुरत्या समायोजनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोडशीळ येथे दोन वर्ष कार्यरत होते.पवन मावळच्या अतिदुर्गम भागात सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी अवघड क्षेत्रात असणाऱ्या बोडशीळ जिल्हा परिषद शाळा महिलांसाठीअनफिट असल्यामुळे पंचायत समिती मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज साहेब यांनी तात्पुरती समायोजन करून येवले यांना बोडशीळ येथे नियुक्ती केली. 



   अतिदुर्गम भागात असणाऱ्या या शाळेत मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शाळेच्या भौतिक सुविधाही वाढवण्यासाठी प्रयत्न केले तसेच शाळेसाठी नवीन इमारतीसाठी चौथा लाख रुपये चा इमारत निधी मंजूर करून घेण्यात त्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समिती वआमदार सुनील शेळके यांच्याकडे  पाठपुरावा केला व यश आले . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नव्हता वाढीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने दखल घेऊन  ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण हनुमंत चोरघे व शाळाव्यवस्थापन समिती ,ग्रामस्थ यांच्या वृत्तीने त्यांना पुरस्कार  देऊन गौरवण्यात आले. मनोगत व्यक्त करताना येवले सर म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवत असताना ग्रामस्थांनी शिक्षकांचा गौरव करणे म्हणजे त्यांच्या कामाला दिलेले एक मोठे प्रोत्साहन ठरेल ग्रामस्थ शिक्षकांच्या पाठीशी उभे असेल तर शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक विकास करण्यात काहीच अडचण येणार नाही. ग्रामस्थ सदैव माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळे मी हे काम साध्य करू शकलो. तसेच हे सर्व करत असताना पंचायत समितीचे बांधकाम इंजिनियर  शिवदे साहेब, विस्ताराधिकारी शोभाताई वहिले व केंद्रप्रमुख संगीता भालघरे व सुनिता देशमुख ,राजेंद्र काढरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असल्याचे मत येवले यांनी व्यक्त केले.



यावेळी प्रविण चोरघे, सचिन चोरघे, मारुती ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चोरघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेणुकाताई ठोंबरे, सुनिता ठोंबरे,लताताई चोरघे, सीमाताई चोरगे, हरीश चोरगे, दिनेश चोरगे श्यामराव चोरघे किरण चोरघे अभिषेक चोरघे व मोठ्या संख्याने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चोरगे यांनी केले तर आभार दिनेश चोरगे यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा