श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५ आयोजन

 


तळेगाव दाभाडे दि. 19 (प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. सामुदायिक सद्भावनेतून दिव्य अनुभुती मिळवण्यासाठी श्री. स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी येथे सदगुरु प.पू. मोरे दादांनी ५० वर्षापूर्वी गुरुप्रणित मार्गाची परब्रम्ह भगवान श्री. स्वामी समर्थ महाराजांचे माध्यमातुन व सद्‌गुरु पिठले महाराजांचे आशीर्वाद व मार्गदर्शनाने वाटचाल केली. गेल्या ५० वर्षापासून भगवान श्री. दत्त महाराजांचे अखंड नामजप संकिर्तन यज्ञ सप्ताह केले. आतापर्यंत कोट्यावधी जप यज्ञ संकिर्तन झालेले आहेत.


भगवंताला यज्ञपुरुष सर्व यज्ञाचा भोक्ता असे म्हणतात. वेदातही म्हटले आहे. 'यज्ञो वै विष्णु' यज्ञ म्हणजेच विष्णु किंवा यज्ञीय कर्म होत. सर्व कर्माचा उद्देश भगवंतालाच (विष्णुला) प्रसन्न करणे होय म्हणुन मनुष्याने नेमुन दिलेले यज्ञ केल्याने उद्दिष्ट साध्य होते. परंतु प्रत्यक्ष विष्णुची सेवा म्हणजेच परब्रम्ह भगवान श्री. दत्त महाराजांची सेवा केली तर कर्माच्या सर्व दुःखातुन, दोषातुन मनुष्य मुक्त होतो. श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्रात वर्षातुन दोन वेळा म्हणजेच श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी व श्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ साजरे केले जातात. सप्ताह कालावधीत आपल्या केंद्रातील सर्व सामान्य सेवेकऱ्यांनी स्वतः स्वयंपुर्ण यज्ञ सप्ताहात भाग घ्यावा. यज्ञनारायणाच्या कृपाप्रसादाने ही भारतभुमी पुन्हा सुजलामब सुफलामब व्हावी यासाठी अखंड नामजप यज्ञ सप्ताह आयोजित केला आहे. 

तरी सर्व भाविकांनी, सेवेकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. गणेश मोहनराव काकडे (अध्यक्ष, सिध्दीविनायक प्रतिष्ठान, तळेगाव स्टेशन)। स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) तळेगाव स्टेशन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सामुदायिक गुरुचरित्र वाचन बॅच १ सकाळी ५:३० ते ७:३० । बॅच २ सकाळी ८:१५ ते १०:३०
तसेच या सप्ताह काळात ग्रामअभियाना अंतर्गत वैयक्तिक, सामाजिक अडचणी पितृदोष, कुलदेवतादोष, वास्तुदोष, ग्रहपीडा, नोकरी, व्यापार उद्योग, व्यसन, शिक्षण, शेती, आरोग्य, विवाह यासारख्या समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. 


स्थळः श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर, समर्थनगर, डी. पी. रोड, तळेगाव दाभाडे
सामुदायिक गुरुचरित्र पारायण नोंदणीसाठी संपर्क
8087592179, 8007631768, 9890190671,9860305233

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा