
पुणे दि.15 (प्रतिनिधी) एम.सी.ई . सोसायटी, डॉ.पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या एच.जी.एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन व इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांच्या समन्वयाने दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2025 रोजी ' भविष्यासाठी तयार असलेल्या शिक्षणाची पूनर्व्याख्या' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.या आंतरराष्ट्रीय परिषदेला संशोधनार्थींचा, प्राध्यापकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ दिल्ली येथील प्रा.अमित आहुजा,यांनी बोलताना आधुनिक काळातील शिक्षणाची आणि शिक्षकाची भूमिका मांडून या परिषदेत पहिले विचार पुष्प गुंफले.तसेच दुसऱ्या सत्राच्या वक्त्या तुर्कीये येथील अंकारा युनिव्हर्सिटी च्या डॉ. गुलसून कुरुबझाक चकर यांनी शिक्षणातील उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर आपले विचार मांडले.
एस.एस.खन्ना गर्ल्स डिग्री कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथील डॉ. रश्मी सिंघ,यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडत परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सहभागींशी संवाद साधला.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी , डॉ. पी. ए.इमानदार विद्यापीठाच्या,एच.जी.एम.आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या अधिष्ठाता व प्राचार्या व परिषद संयोजक डॉ.अनिता बेलापूरकर , इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी चे रिजनल डायरेक्टर डॉ.राजेंद्र प्रसाद , डॉ. पी. ए.इमानदार विद्यापीठाचे रजिस्ट्रार श्री.धनंजय पाळणे,प्रमुख वक्ते डॉ.अमित आहुजा आदि मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेसाठी सर्व शिक्षणसंस्थांचे प्रमुख, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका, संशोधनार्थी, अभ्यासक यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.30 पेक्षा अधिक संधोधनार्थिनी आपले शोध पेपर परिषदेत सादर केले.डॉ.पुष्पा पाटील आणि डॉ.वृषाली रोकडे यांनी कार्य समन्वयक म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे काम पाहिले.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.
Comments
Post a Comment