सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेला अद्ययावत इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळा

 


इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळचे उद्घाटन करताना  संस्थेच्या संस्थापिका स्वाती नामजोशी व इतर

पवनानगर ता.१७ (प्रतिनिधी ) येथील पवना शिक्षण संकुल पवनानगर शाळेसाठी पुणे कोथरूड येथील सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने शाळेसाठी  भौतिक शास्त्र, जीवशास्त्र व गणिताचे मॉडेल असे सात लक्ष अत्याधुनिक प्रयोगशाळेचे रुपयांचे उपलब्ध करून देण्यात  आली.


इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळचे उद्घाटन करताना संस्थेचे सचिव व‌ पवना संकुलाचे अध्यक्ष संतोषजी खांडगे व इतर

यावेळी सार्थक फाऊंडेशच्या संस्थापिका स्वाती  नामजोशी व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकुशल सचिव संतोषजी खांडगे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले 
यावेळी सार्थक वेल्फेअर फाउंडेशनचे व शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष मोहोळ यांच्या प्रयत्नातून ही अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे.

 

यावेळी कार्यक्रमासाठी सार्थक वेल्फेअर फाउंडेशनचे सिध्देश पुरंदरे, संग्राम मदने, सुभाष मोहोळ, संस्थेचे संचालक  महेशभाई शहा, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, पवना प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे पालक सुनिल (नाना) भोंगाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे, शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे उपस्थित होते.


यावेळी बोलताना नामजोशी म्हणाल्या की, यापुढील काळात शाळेच्या भौतिक सुविधा वाढविण्यासाठी विविध सी.एस.आर फंड व सार्थक फाऊंडेशन प्रयत्न करणार आहे 
यावेळी बोलताना खांडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खरी गुणवत्ता असते ती वाढविण्यासाठी  सार्थक फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद आहे 
यावेळी सर्व पाहुण्यांनी अत्याधुनिक भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व गणिताच्या मॉडेलची पाहणी करून माहिती घेतली.सर्व प्रकल्पाविषयी माहिती विज्ञान विभाग प्रमुख वंदना मराठे यांनी पाहुण्यांना दिली.
संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे  यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलाचे जेष्ठ अध्यापक राजकुमार वरघडे व विजय वरघडे यांनी पाठपुरावा करुन ही प्रयोगशाळा  मिळवण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख वंदना मराठे यांनी सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले तर आभार गणेश ठोंबरे यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

 

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा