यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन

 


तळेगाव दाभाडे दिनांक 24 (प्रतिनिधी) येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या महाविद्यालयासाठी इमिटेक टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि. तळेगाव दाभाडे या कंपनीकडून C.S.R. फंडामार्फत 65 लाख रुपये किंमतीची अद्यावत संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली असून सदर संगणक प्रयोगशाळेचे  उद्घाटन  फ्लोरियन हिट्झर (डायरेक्टर, इमिटेक टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.),मा. आशिष भल्ला (मॅनेजिंग डायरेक्टर अॅन्ड सी.ई.ओ., इमिटेक टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.), मा. कौस्तुभ कुलकर्णी (परचेस हेड, इमिटेक टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.),  मा. अनिल केतकर (कंपनी सेक्रेटरी, इमिटेक टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.), यांचे शुभहस्ते गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. झाले.


 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रामदासजी काकडे यांनी भूषविले. यावेळी मा. संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे, माजी राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. चंद्रकांतजी शेटे साहेब, कार्यवाह, इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, शैलेश भाई शहा सर, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खजिनदार व संस्थेचे सदस्य मा. निरुपा कानिटकर, मा. संजय साने, संदीप काकडे, युवराज काकडे, रणजीत काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ. संजय आरोटे, रोटरीचे अध्यक्ष कमलेश कार्ले, सदस्य श्री मेनते सर्व विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


प्रास्तविक निरूपा कानिटकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. अजित जगताप व प्रा. प्राची भेगडे यांनी केले तर आभार चंद्रकांत शेटे यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

 

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा