जिद्द, चिकाटी, अभ्यासातील सातत्य व परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते: स्नेहा थोरात ( दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग)

खुटबाव, दि.7(प्रतिनिधी) 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश प्रथमवर्ग परीक्षेतून खुटबाव येथील कु.स्नेहा संगीता गोरकनाथ थोरात यांची दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग या पदावर पहिल्याच प्रयत्नात निवड झाल्याबद्दल तसेच त्यांचे बंधू अनिकेत थोरात यांची नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल खुटबाव ग्रामस्थांच्या वतीने दोघा भावंडांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित केला होता. या सत्काराला उत्तर देताना स्नेहा थोरात बोलत होत्या. 


 लहानपणापासूनच स्नेहा या अतिशय हुशार विद्यार्थिनी होत्या.आपल्या यशाच्यामध्ये आई-वडिलांचा मोलाचा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच आपले यशाचे गमक सांगताना अभ्यासाचे केलेले योग्य नियोजन,जिद्द,चिकाटी तसेच भाऊ अनिकेत यांच्यापासून घेतलेली प्रेरणा या सर्व जमेच्या बाजू होत्या असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळेच ये घवघवीत यश प्राप्त करता आले असे त्या म्हणाल्या. तसेच आमच्या आई सौ. संगीता थोरात या बीए. बी.एड. असून सुद्धा त्यांनी केवळ आमच्या शिक्षणासाठी व  करिअरसाठी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली नाही याचं आज सार्थक झाल्याचा भाव आमच्या आईच्या डोळ्यांमध्ये दिसून येतो हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या यशामध्ये खुटबाव गावातील ग्रामस्थांचा सुद्धा मोलाचा वाटा असल्याचे मत व्यक्त करायला त्या विसरल्या नाहीत. येणाऱ्या काळामध्ये खुटबाव व  पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दोघा बहीण भावांनी दिले. अनिकेत थोरात यांनी सुद्धा खुटबाव ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल,सन्मान बद्दल आभार व्यक्त केले.



 यावेळी खुटबाव ग्रामस्थांच्या वतीने दोघा बहीण भावांची वाजत गाजत गावातून भव्य मिरवणूक काढून दौंड तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार पी.डी.सी.सी. बँकेचे संचालक सहकार महर्षी, आदरणीय रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन स्नेहा व अनिकेत तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही सन्मान करण्यात आला.


 आदरणीय रमेश आप्पा थोरात यांनी यावेळी दोघा बहिण भावांचा तालुक्यातील युवा वर्गाने विद्यार्थ्यांनी, आदर्श व  त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचे आवाहन करून सर्व ग्रामस्थांच्या वतीने दोघांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 यावेळी दौंड तालुका टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने कुमारी स्नेहा व अनिकेत यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला तसेच पंचक्रोशीतील इतर सामाजिक संस्थांच्या वतीने तसेच वैयक्तिक सन्मान करण्यात आले.
 या सत्कार सन्मान सोहळ्याच्या वेळी  अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दोघांना शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्याने शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती उद्योजक विश्वास आबा कोहकडे, दौंड पंचायत समितीचे मा. उपसभापती सयाजी अण्णा ताकवले, दौंड तालुका मुख्या. संघाचे अध्यक्ष रामचंद्र नातू सर, वैभव इथापे, ह.भ.प श.संजय महाराज वाबळे, बाबासाहेब दौंडकर यांचा समावेश होता. 


 यावेळी खुटबावच्या सरपंच सौ. शितोळे मॅडम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पोपटभाई ताकवले, दौंड खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष शिवाजी वाघोले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. नगरसेवक माऊली थोरात, मार्केट कमिटीचे सदस्य मोहन टुले,सरपंच सुभाष बोत्रे, अरुण थोरात, माजी सरपंच शिवाजी बापू थोरात, खुटबाव सोसायटीचे मा. व्हाईस चेअरमन महेश थोरात,सुनील ताकवले, कर्नल बबन बापू थोरात, सकाळचे वार्ताहार प्रकाश शेलार, तसेच दौंड तालुका टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, हडपसर मित्र परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक आप्तेष्ट,माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का. सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य तसेच खुटबाव व  पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


 कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून श्री. भाऊसाहेब ढमढेरे यांनी जी.के. थोरात सरांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी विशद करून खुटबाव गावातील एक आदर्श कुटुंब असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नवनाथ थोरात यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांचे थोरात परिवाराच्या वतीने आभार श्री.संतोष थोरात यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा