सीएसआयटी महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के गीतामाता कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

 


पिंपरी, ता. 9 (प्रतिनिधी ) : पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या सीएसआयटी पूर्णानगर ज्युनियर कॉलेजने यंदाही विज्ञान शाखेत १०० टक्के निकालाची परंपरा जपली आहे. विज्ञान शाखेतील श्रेयश पटणी या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत  माहिती व तंत्रज्ञान विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, विश्वस्त डॉ. प्रीती व डॉ. आशा पाचपांडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



प्राचार्या अपर्णा मोरे यांनी सांगितले की, संस्थेच्या विज्ञान शाखेचा निकाल सलगपणे १०० टक्के लागणे ही संस्थेच्या गुणवत्ता व मेहनतीचे फलित आहे. 

विज्ञान शाखेतील इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आर्या झांबरे व विदुला पलांडे (८४.३३%), रितेश सावंत (८४.१७%) आणि पार्थ वर्मा (८२.३३%) यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८६.९५ टक्के लागला आहे. या शाखेत शिवम दुबे (८३%), देवेंद्र गेहलोत (८२.६७%) आणि शिबा खान (८०.५०%) यांनी प्रथम तीन क्रमांकावर यश मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.



गीतामाता इंग्लिश आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत अत्युच्च निकाल नोंदवला आहे. यंदा कॉलेजचा एकूण निकाल ९८.७२% इतका लागला असून यामध्ये सर्व विभागांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे , डॉ. ललित कनोरे, प्राचार्य कविता उपलंचिवार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील शिक्षण आणि करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.



 विभागवार निकाल:
सायन्स विभाग: निकाल– १००%
 विभागातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
१. बोबडे तेजस प्रताप – ९३.५०% (५६१/६००)
२. रांगटे गौतमी मिलिंद – ९१.१७% (५४७/६००)
३. नरखेडे सानिका प्रदीप – ९०.६७% (५४४/६००)
कॉमर्स विभाग: निकाल – ९५.४५%
कॉमर्स विभागाने ९५.४५% निकाल साधून उत्तम कामगिरी केली आहे. विभागातील शैक्षणिक गुणवंत पुढीलप्रमाणे:
१. चौधरी आफरीन अब्दुल वहाब – ८१.६७% (४९०/६००)
२. चौधरी हितेश हिराराम – ७३.८३% (४४३/६००)
३. जाधव प्रीती राजू – ७३.३३% (४४०/६००)
आर्ट्स विभाग: निकाल – ९०%
आर्ट्स विभागाने ९०% निकाल साधत सातत्याने चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे. विभागातील टॉपर्स:
१. चौधरी वीणा फुआराम – ८८.३३% (५३०/६००)
२. खान नझरीन फातेमा अब्दुल मजीद – ७४.५०% (४४७/६००)
३. कोळी प्रियांका बालू – ६०.३३% (३६२/६००)
“या यशामध्ये विद्यार्थ्यांचा परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. भविष्यातही आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहोत,” असे कॉलेजच्या प्राचार्य कविता उपलंचिवार यांनी सांगितले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा